छत्रपती संभाजीनगर : पांढऱ्या वाघिणीने दिला दोन बछड्यांना जन्म | पुढारी

छत्रपती संभाजीनगर : पांढऱ्या वाघिणीने दिला दोन बछड्यांना जन्म

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या सिद्धार्थ उद्यान प्राणिसंग्रहालयातील अर्पिता नावाच्या पांढऱ्या वाघीनीने गुरुवारी पहाटे दोन बछड्यांना जन्म दिला. वाघीनीसह दोन्ही बछडे सुखरुप असल्याची माहिती प्राणिसंग्रहालयाचे पशु संवर्धन अधिकारी डाॅ. शाहेद शेख यांनी दिली. विशेष म्हणजे दीड महिन्यातच उद्यानातील समृद्धी नावाच्या पिवळ्या वाघीनीने एक बछड्याला जन्म दिला होता. आणि आता अर्पिताने दोन बछड्यांना जन्म दिल्याने उद्यानातील वाघांची संख्या १४ वर पोहचली आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button