Nitin Bagate: नितीन बगाटे छत्रपती संभाजीनगराचे नवे पोलीस उपायुक्त

Nitin Bagate: नितीन बगाटे छत्रपती संभाजीनगराचे नवे पोलीस उपायुक्त

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: सिंधुदुर्गचे अपर पोलीस अधीक्षक तथा दबंग आयपीएस अधिकारी नितीन दत्तात्रय बगाटे (Nitin Bagate) यांची पोलीस उपायुक्त म्हणून छत्रपती संभाजीनगरात बदली झाली आहे. शासनाने शुक्रवारी (दि. 8) याबाबतचा आदेश काढला. वादग्रस्त उपायुक्त दीपक गिऱ्हे यांच्या बदलीनंतर उपायुक्ताचे एक पद रिक्त होते.

पोलीस उपायुक्त नितीन बगाटे (Nitin Bagate) हे मूळचे हिंगोली जिल्ह्यातील निशाणा येथील रहिवासी आहेत. त्यांनी सुरुवातीला शिक्षक म्हणून काम केले होते. आयआयटीतून शिक्षण घेतल्यानंतर काही वर्षे ते पुण्यात एका खासगी कंपनीत नोकरीला होते. त्यानंतर ते आयपीएस अधिकारी बनले. परभणी येथे २०१८ ते २०२० याकाळात ते प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी तथा सहायक पोलीस अधीक्षकपदी कार्यरत होते. नितीन बगाटे यांची दबंग अधिकारी म्हणून ख्याती आहे. त्यांनी परभणी, चंद्रपूर, सिंधुदुर्ग येथे काम केले आहे.

Nitin Bagate : परभणीत अवैध वाळू वाहतुकीवर जोरदार कारवाई

परभणीत विधानसभा निवडणूक दरम्यान त्यांची तत्कालीन विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्याशी बाचाबाची झाली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या परभणीतील सभेत डी झोनमध्ये शिरलेल्या कार्यकर्त्यांना उठवण्याचा प्रयत्न केल्यावरुन बगाटे आणि धनंजय मुंडे यांच्यात हा वाद झाला होता. त्यानंतर मोठ्या प्रमाणात वाळूचे टिप्पर पकडल्यावरुन त्यांचा खासदार संजय जाधव यांच्याशीही वाद झाला होता.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news