परभणी: सुनेगाव येथे मराठा समाजाचे इंद्रायणी नदीत अर्धनग्न जलसमाधी आंदोलन

परभणी: सुनेगाव येथे मराठा समाजाचे इंद्रायणी नदीत अर्धनग्न जलसमाधी आंदोलन

गंगाखेड, पुढारी वृत्तसेवा : गंगाखेड तालुक्यातील सुनेगाव (सायळा) येथील सकल मराठा समाजाच्या वतीने इंद्रायणी नदीच्या पात्रात दिवसभर अर्धनग्न जलसमाधी आंदोलन शुक्रवारी (दि.८) केले. अंतरवाली सराटी (जि.जालना) येथील मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढा देत असलेले मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून हे आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात कृष्णा सुर्यवंशी, रामेश्वर सुर्यवंशी, गोपाळ सुर्यवंशी, वैभव सुर्यवंशी, हरिभाऊ सुर्यवंशी, अनिल सुर्यवंशी, मदन सुर्यवंशी, ओमकार सुर्यवंशी, ज्ञानेश्वर लवंदे, बालासाहेब सुर्यवंशी, केदार शिंदे, दिलिप शिंदे, माणिक सुर्यवंशी व अभिमन्यू सुर्यवंशी यांनी सहभाग नोंदविला.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news