परभणी : मानवत तालुक्यातील ५३ गावात लाक्षणिक उपोषण सुरू | पुढारी

परभणी : मानवत तालुक्यातील ५३ गावात लाक्षणिक उपोषण सुरू

मानवत : डॉ सचिन चिद्रवार मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात सरसकट आरक्षण मिळावे या मुख्य मागणीसाठी मानवत तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने आज (शुक्रवार) सकाळी ९:३० च्या सुमारास तालुक्यातील एकूण ५३ गावात एकाच दिवशी एकाच वेळी एक दिवसीय लाक्षणिक उपोषणाला सुरुवात झाली.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मानवत तालुक्यात आता आंदोलन पेटले आहे. कडकडीत शहर बंद, मोर्चा, निवेदने, राजीनामा या नंतर आता तालुक्यातील एकूण ५३ गावात ग्रामपंचायत किंवा मोकळ्या जागेत आज (शुक्रवार) लाक्षणिक उपोषणाला सुरुवात करण्यात आली. तालुक्यातील नागरजवळा व माणोली येथे राज्य सरकार विरोधात आंदोलन करण्यात आले. कोल्हा येथे राष्ट्रीय महामार्गालगतच आंदोलन सुरू करण्यात आले. साखरेवाडी येथे गावातून मोठी रॅली काडून उपोषणास सुरुवात करण्यात आली. रत्नापूर येथे अर्धनग्न अवस्थेत उपोषण सुरू करण्यात आले आहे.

एकाच दिवशी ५३ ठिकाणी होत असलेल्या आंदोलनामुळे तहसील व पोलीस प्रशासनाची चांगलीच दमछाक होताना दिसून येत आहे. सोमवारी ता. ११ मानवत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकासमोर तालुक्यातील एकूण ५३ गावातील नागरिक एकत्रित लाक्षणिक उपोषण करणार आहेत.

हेही वाचा : 

Back to top button