परभणी: अन्नत्याग करत मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला नरवाडीकरांचा पाठिंबा

परभणी: अन्नत्याग करत मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला नरवाडीकरांचा पाठिंबा

सोनपेठ, पुढारी वृत्तसेवा: जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथील मनोज जरांगे- पाटील यांच्या आंदोलनाला नरवाडीकरांनी  अन्नत्याग आंदोलन करत पाठिंबा दिला. सोनपेठ तालुक्यातील नरवाडी येथील महिलांसह ग्रामस्थांनी आज (दि. ८) येथील हनुमान मंदिर परिसरात एकत्रित येऊन दिवसभरासाठी अन्नत्याग आंदोलन केले. मराठा आरक्षणासंदर्भात असलेल्या आपल्या तीव्र भावना व्यक्त करत मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा दिला.

गावातील मुलाबाळांसह, महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. यावेळी मराठा आरक्षणावर कायद्याच्या अंतर्गत सखोल चर्चा झाली. अनेक मान्यवरांनी आरक्षण किती गरजेचे आहे, हे यावेळी सांगितले.

यावेळी गावातील पांडूरंग जोगदंड, रामेश्वर जोगदंड, गंगाधर जोगदंड, नामदेव जोगदंड, राजेभाऊ पांडुळे, शिवराज जोगदंड, विष्णू जोगदंड, सिद्धेश्वर पांडुळे ,अर्जुन जोगदंड, गोकुळ पांडुळे, गोविंद जोगदंड, संतोष मस्के, लक्ष्मण जोगदंड, नाना‌ गांगर्डे ,गणेश सपकाळ,गोपाळ कदम भगवान जोगदंड गोपाळ मस्के, गोपाळ जोगदंड, रामानंद जोगदंड, मंगेश जोगदंड ,अमोल गांगर्डे, गणेश माने, ज्ञानेश्वर जोगदंड ,अमोल पांडुळे, कृष्णा पुकाने, गोपाळ जोगदंड, ज्ञानोबा जोगदंड ,मुंजा पुकाने, रतन पांडुळे, कृष्णा वायंगडे, रामेश्वर जोगदंड, उद्धव जोगदंड यांच्यासह असंख्य मुलाबाळांसह महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.

दरम्यान, सोनपेठ पोलिसांकडून सहाय्यक पोलिस निरिक्षक सुनिल अंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
भारत राष्ट्र समितीचे माणिक कदम, सुधीर बिंदू, राष्ट्रवादीचे ॲड. श्रीकांत विटेकर, दशरथ सुर्यवंशी, अब्दुल्ला सौदागर, समयौद्दीन काझी, उक्कडगावचे भाऊसाहेब मोरे, बोंदरगावचे मदन सपकाळ, खडका येथील राकेश यादव, सोनपेठ शहरातील नारायण रोडे, धनंजय मोहिते‌ यांनी भेट देऊन अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा दिला.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news