परभणी: जालना घटनेच्या निषेधार्थ जिंतूरमध्ये कडकडीत बंद | पुढारी

परभणी: जालना घटनेच्या निषेधार्थ जिंतूरमध्ये कडकडीत बंद

जिंतूर, पुढारी वृत्तसेवा : जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटे येथे मराठा आंदोलकांवर केलेल्या अमानुष लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ आज (दि.५) जिंतूर बंदची हाक देण्यात आली होती. यावेळी सकल मराठा समाजाच्या वतीने राज्य सरकारची अंत्ययात्रा काढून भव्य मोर्चा काढण्यात आला. यावेळी घोषणांनी शहर दुमदुमून गेले होते. Jalna Maratha Andolan

जिंतूर येथील सकल मराठा समाजाच्या वतीने शहर कडकडीत बंद ठेऊन भव्य मोर्चा काढला. हजारोच्या संख्येने मराठा समाज रस्त्यावर उतरल्याने घोषणांनी शहर दुमदुमून गेले. तहसील कार्यलयात मागण्यांचे निवेदन देऊन मोर्चाचा समारोप करण्यात आला. बंदला व्यापाऱ्यांनी पाठिंबा दिला. 100 टक्के बंद यशस्वी झाला. पोलीस निरीक्षक अनिरुद्ध काकडे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. Jalna Maratha Andolan

Jalna Maratha Andolan मुंडन करून केला निषेध

राज्य सरकारची तिरडीवर अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष गणेश काजळे व संभाजी ब्रिगेड तालुका उपाध्यक्ष अनिल गाडेकर यांनी मुंडन करून निषेध व्यक्त केला.

हेही वाचा 

Back to top button