जालना घटनेच्या चौकशीचा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सादर करणार : अतिरिक्त पोलिस महासंचालक संजय सक्सेना | पुढारी

जालना घटनेच्या चौकशीचा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सादर करणार : अतिरिक्त पोलिस महासंचालक संजय सक्सेना

वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा अंतरवाली सराटी येथे लाठीचार्ज व दगडफेकीचा प्रकार घडला होता. याबाबत मुख्यमंत्र्यांनी चौकीशीचे आदेश दिले होते. त्‍यामुळे अंतरावली सराटी गावात आलो आहे. मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे. या घटनेच्या चौकशीचा अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सादर करणार आहोत असे अतिरिक्त पोलिस महासंचालक संजय सक्सेना यांनी पत्रकार परिषदेत सांगतिले.

अंतरवाली सराटी येथील आमरण उपोषणाचा आज नववा दिवस असून, आज (बुधवार) सकाळी 8 वाजता मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली आहे. याची ताबडतोब आरोग्य विभागाकडून दखल घेऊन उपोषण स्थळी त्यांना सलाईन लावण्यात आले आहे.
घटना स्थळी महासंचालक संजय सक्सेना विभागीय पोलिस आयुक्त डॉ ज्ञानेश्वर चव्हाण, पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी भेट घेऊन मनोज जरांगे पाटील यांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे. यावेळी पोलिस महानिरीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण इतर अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा : 

Back to top button