Manoj Jarange Patil Maratha reservation : बांबूच्या काठीला सलाईन! आंतरवाली सराटीत उपोषणस्थळी आरोग्याचे तीन तेरा | पुढारी

Manoj Jarange Patil Maratha reservation : बांबूच्या काठीला सलाईन! आंतरवाली सराटीत उपोषणस्थळी आरोग्याचे तीन तेरा

वडीगोद्री (जि. जालना ) पुढारी वृत्तसेवा : उपोषणाच्या आजच्या नव्या दिवशी उपोषणकर्ते मनोज जरांगे-पाटील यांची तब्येत खालवली आहे. सकाळी आरोग्य पथकाने तपासणी केली.  (Manoj Jarange Patil Maratha reservation) त्यात बीपी कमी होता. शुगरचे प्रमाण कमी होते. घश्याचे इन्फेक्शन वाढत चाललेले असताना या ठिकाणी दिवसाचे आरोग्य पथकाचे जे मेडिकल ऑफिसर आहेत, ते मेडिकल ऑफिसर अद्यापही या ठिकाणी आलेले नाहीत. (Manoj Jarange Patil Maratha reservation)

सीएचओ मार्फत आज सकाळपासून उपचार सुरू आहेत. वैद्यकीय अधिकारी हे गैरहजर होते. या ठिकाणी सुविधाचा वाणवा आहे. उपोषणकर्ते मनोज जरांगे यांना सकाळी सलाईन लावले होते. पण ते बांबूच्या काठीला अडकवून सलाईन लावण्यात आले. त्यामुळे आरोग्याचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. यासाठी साधे सलाईन स्टँडदेखील उपलब्ध नव्हते. सलाईनचे स्टँण्ड हे या ठिकाणी प्रशासन पुरवू शकले नाही. त्यामुळे आरोग्य विभागाच्या या भोंगळ कारभाराच्या विरोधात आंतरवालीकर संतप्त झालेले आहेत.

सध्या परिसरात व्हायरल आजाराची साथ मोठ्या प्रमाणावर पसरली आहे. या ठिकाणी आरोग्य विभागाकडून हॅण्ड सॅनिटायझर निर्जंतुकीकरण साहित्य, कुठल्याही सुविधा किंवा त्याची काळजी घेण्यासाठी साधन उपलब्ध करून दिलेली नाहीत.

दिवस पाळीतील आरोग्य पथकातील वैद्यकीय अधिकारी डॉ. काकडे हे सकाळी नऊ वाजता रुजू होणार होते. मात्र ते साडे दहा पर्यंतही आले नव्हते. त्यामुळे सीएचओ डॉ. चंद्रशेखर पालवे हे उपचार करत आहेत. आरोग्य उपकेंद्राचे डॉ. पालवे यांनी सलाईन लावले. पण कोणते सलाईन वापरले, याबाबत त्यांनी कोणतीही स्पष्ट माहिती सांगितली नाही.

या ठिकाणी प्रत्येक सहा तासाला आरोग्य तपासणी सीएचओद्वारे होते. परंतू, ही तपासणी वैद्यकिय अधिकाऱ्याद्वारे प्रत्येक सहा तासाला पूर्ण आरोग्य तपासणी व्हावी, अशी गावकऱ्यांची मागणी आहे.

आंदोलनकर्ते जरांगे-पाटील यांच्या प्रकृतीबाबत काही कमी जास्त झाल्यास प्रशासनाला ते महागात पडणार आहे. प्रशासनाने आता वेळीच सावध होऊन त्यांच्या आरोग्याची काळजी प्रथम प्राधान्याने घ्यावी, अशीच मागणी गावकरी करत आहे.

या ठिकाणी रात्रं-दिवस एमओची म्हणजेच वैद्यकीय अधिकाऱ्याची नेमणूक करावी, आरोग्य सुविधा पुरवाव्या आणि कार्डियाक रुग्णवाहिका उपलब्ध करून द्यावी, याबाबत आरोग्यमंत्र्यांनी दखल घेऊन तात्काळ रात्रं-दिवस चमुची नियुक्ती या ठिकाणी करावी अशी मागणी केली आहे.

Back to top button