पुढारी ऑनलाईन डेस्क : सरकारचे शिष्टमंडळ अध्यादेश घेऊनच येईल, असा विश्वास मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, चर्चा केल्याशिवाय मार्ग निघणार नाही. जीआर निघालयाशिवाय मागे हटणार नाही. आधी अध्यादेश आणा मग उपोषण सोडतो. जरांगे पाटील हे जालन्यातून प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
जरांगे -पाटील म्हणाले, सरकारने आधीचे पाढे वाचले. सरकारच्या लोकांनी आधीच अध्यादेश घेऊन यावा. आमचा लढा मराठवाड्यातील मराठी बांधवांसाठी आहे. मराठी समाज भविष्यासाठी झगडत आहे. सुप्रीम कोर्टात आरश्रणाबाबत मागणी नाही. आता मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाकडे आमचे लक्ष आहे. मुख्यमंत्री शिंदे योग्य निर्णय घेतील.