छ. संभाजीनगर: जालना घटनेच्या निषेधार्थ वकील संघाच्यावतीने मूकमोर्चा

छत्रपती संभाजीनगर: पुढारी वृत्तसेवा: मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी मौजे अंतरवाली सराटी (ता. अंबड, जि. जालना) येथे उपोषण तथा शांततेच्या मार्गाने आंदोलन चालू होते. पोलीस प्रशासनाने हवेत गोळीबार करून निष्पाप मराठा आंदोलकांवर अमानुषपणे लाठीमार केला. या घटनेत अनेक आंदोलक जखमी झाले.
या घटनेचा जाहीर निषेध म्हणून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वकील संघाच्या वतीने मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. अदालत रोड येथील जिल्हा सत्र नायायालय ते क्रांती चौक असा हा मोर्चा काढण्यात आला.
हेही वाचा