परभणी, पुढारी वृत्तसेवा : गेल्या महिनाभरापासून पावसाने ओढ दिली आहे. यामुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थीतच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने मराठवाडा दुष्काळग्रस्त जाहीर करावा. शेतकर्यांना सरसकट हेक्टरी 1 लाख रूपयांची मदत द्यावी, या मागणीसाठी संभाजी सेनेच्या वतीने आज (दि.४) सकाळी 11 च्या सुमारास ब्राह्मणगाव फाटा (जि.परभणी) येथे रास्तारोको आंदोलन केले. यामुळे परभणी-गंगाखेड मार्गावरील वाहतुक काही काळ ठप्प झाली होती. (Parbhani)
मराठवाड्यात साधारणतः महिनाभरापासूनच पावसाने दांडी मारली आहे. परिणामी वाढीच्या अवस्थेत असलेली पीके करपू लागली आहेत. अनेक भागात तर तब्बल 21 दिवसांपेक्षा जास्त पाऊस पडलेला नाही. तर काही भागात अद्यापही पावसाची नोंद नाही. शेतकर्यांनी दुबार पेरणी केलेली पीके देखील जाण्याच्या मार्गावर आहेत. या परिस्थीतीत शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून तो आत्महत्येच्या मार्गावर जात आहे. या बिकट परिस्थीतीमध्ये शेतकर्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी मराठवाडा दुष्काळग्रस्त जाहीर करून हेक्टरी 1 लाख रूपयांची मदत देण्यात यावी. पीकविम्याचा अग्रीम तात्काळ 25 टक्के देण्यात यावा. आदी मागण्यांसाठी संभाजी सेनेचे प्रदेशाध्यक्ष रामेश्वर शिंदे, शहराध्यक्ष अरूण पवार आदींसह कार्यकर्त्यांनी ब्राह्मणगाव फाटा येथे रास्तारोको आंदोलन केले.
हेही वाचा