अजिंठा; पुढारी वृत्तसेवा जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठी आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ अजिंठा येथील सकल मराठा समाजाच्यावतीने अजिंठा येथील जळगाव – छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील अजिंठा चौफुलीवर आज (सोमवार) सकाळी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
या यावेळी आंदोलनकर्त्यांनी मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्यात यावे. आरक्षणाची मर्यादा वाढवण्यात यावी. तसेच अंबड तालुक्यात अंतरवाली सराटी गावातील आंदोलकांवर पोलिसांनी अमानुषपणे लाठीचार्ज केला. या प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदार असलेल्यांवर कारवाई करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी अजिंठा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद भिंगारे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
अजिंठा चौफुली येथे जमलेल्या मराठा समाजातील शेकडो आंदोलनकर्त्यांनी निषेध व्यक्त करीत राज्य सरकार आणि गृह खात्याच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख रघुनाथ चव्हाण, प्रभाकर चव्हाण, प्रेम पाटील, अंकुश पंडित, विशाल देशमुख, अरुण चव्हाण,शंकर पाटील, लक्ष्मण चव्हाण, विक्रम चव्हाण आदींसह शेकडो मराठा बांधव यावेळेस उपस्थित होते. यादरम्यान अजिंठा पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
हेही वाचा :