छ. संभाजीनगर: जालना लाठीमार घटनेच्या निषेधार्थ वाळूजमध्ये कडकडीत बंद | पुढारी

छ. संभाजीनगर: जालना लाठीमार घटनेच्या निषेधार्थ वाळूजमध्ये कडकडीत बंद

वाळूज महानगर; पुढारी वृत्तसेवा: जालना लाठीमार घटनेच्या निषेधार्थ आज (दि.४) वाळूज महानगरात कडकडीत बंद पाळण्यात आला. यावेळी सकल मराठा समाजाच्या वतीने बजाजनगरातील महाराणा प्रताप चौकापासून दुचाकी रॅली काढली. मोरे चौक, त्रिमूर्ती चौक, आंबडेकर चौक मार्गे काढण्यात आलेल्या या रॅलीचा जयभवानी चौकात समारोप करण्यात आला.

अनुचित प्रकार घडू नये, म्हणून एमआयडीसी वाळूज पोलिसांच्या वतीने परिसरातील तिरंगा चौक, महाराणा प्रताप चौक, स्टरलाईट कंपनीसमोर, रांजणगाव फाटा, एनआरबी चौक, एएस क्लब, बजाज कंपनीसमोर, तिसगाव चौक, रांजणगाव येथील दत्तनगर फाटा, सिडको वाळूज महानगर, पंढरपूर, वडगाव तसेच बजाजनगर येथील मोहटादेवी चौक आदी ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला होता.

दरम्यान, या बंदमधून कंपन्या तसेच अत्यावश्यक सेवा यांना वगळण्यात आल्या असल्याने आज वाळूज एमआयडीसी मधील सर्व कंपन्या सुरळीत सुरू होत्या. पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांनी आज सकाळी वाळूज औद्योगिक परिसरात भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.

हेही वाचा 

Back to top button