हिंगोली : जवळाबाजार येथे बाजारपेठ कडकडीत बंद

जवळाबाजार येथे बाजारपेठ बंद
जवळाबाजार येथे बाजारपेठ बंद

जवळा बाजार ; पुढारी वृत्‍तसेवा हिंगोली जिल्ह्य़ातील जवळाबाजार येथे आज (सोमवार) बाजार पेठ कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. जालना जिल्ह्य़ातील मराठा आरक्षणासाठी उपोषणास बसलेल्यावर  लाठीचार्ज झाला होता. सदरील घटनेनंतर शुक्रवार व शनिवार आणि रविवार राज्यात मोठ्या प्रमाणात निषेध आंदोलन व  बाजार पेठ बंद ठेवुन निषेध करण्यात आला.

दरम्‍यान आज जवळाबाजार येथे सकल मराठा समाजातर्फे जवळाबाजार बंद आयोजन करण्यात आले होते. या बंद मध्ये सकाळपासूनच पानटपरी, हॉटेल, लहान व्यवसाय करणारी मंडळी व बाजार पेठतील सर्व व्यापारी वर्गाकडून बंद मध्ये आपली दुकान बंद ठेवुन निषेध व्यक्त करण्यासाठी सकाळपासूनच बाजार पेठ कडकडीत बंद पाळण्यात आला आहे.

जालना जिल्ह्य़ातील अंतरवाली सराटी मराठा आरक्षणावर उपोषणकर्त्यांवर झालेल्या लाठी चार्ज घटनेचा निषेध करण्यासाठी जवळाबाजार परिसरातील सकल मराठा समाजाकडून दिनांक २ सप्टेंबर रोजी येथील पोलीस चौकीस व तहसील कार्यालय औंढानागनाथ येथे निषेध व्यक्त करून निवेदन देण्यात आले, तर औंढानागनाथ येथे राज्याचे वनमंत्री मा.सुधीर मुनगंटीवार यांना सकल मराठा समाजाकडून घेराव घालून निषेध व्यक्त करून निवेदन देण्यात आले होते.

दिनांक ३ सप्टेंबर रोजी येथील आठवडी बाजार असतो. दुपार पर्यंत बाजार पेठ सुरळीतपणे सुरू असताना अचानक दुपारी ३ दरम्यान एका तरूणाने परभणी-हिंगोली मार्गावर जवळाबाजार येथील बसस्थानक परिसरातील चौकात आपली मोटरसायकल उभी करून मराठा आरक्षणावर उपोषणकर्त्यांवर लाठीचार्ज झालेला घटनेचा निषेध व्यक्त करून आपली मोटरसायकल पेटवून दिली. यामुळे या मार्गावर खळबळ उडाली. तात्काळ घटनास्थळी पोलीस दाखल झाले व तरुणास ताब्यात घेऊन मार्गावर वाहतूक सुरळीत केली.  त्या नंतर पोलीस बंदोबस्त बसस्थानक परिसरात वाढविण्यात आला. दिनांक ४ सप्टेंबर रोजी सकल मराठा समाजाकडून जवळाबाजार बाजार पेठ बंद ठेवण्यासाठी रविवारी सायंकाळी पोलीस प्रशासनास निवेदन देण्यात आले होते. सोमवार सकाळपासूनच बाजारपेठे मध्ये कडकडीत बंद पाळण्यास सुरुवात झाली. पानटपरी, हॉटेल व व्यापारी वर्गाकडून आपली दुकाने बंद ठेवुन निषेध व्यक्त करून बंद मध्ये सहभाग घेतला.  पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आपात्कालीन सुविधा बंद मधुन वगळण्यात आली आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news