Karnataka | चित्रदुर्गमध्ये भीषण अपघात, ट्रकला कारची धडक, ४ ठार, ३ जखमी | पुढारी

Karnataka | चित्रदुर्गमध्ये भीषण अपघात, ट्रकला कारची धडक, ४ ठार, ३ जखमी

पुढारी ऑनलाईन : कर्नाटकातील (Karnataka) चित्रदुर्गमध्ये भीषण अपघात झाला आहे. चित्रदुर्गमधील मल्लापुरा-गोलारहट्टीजवळ एका उभ्या ट्रकला कारने धडक दिल्याने ४ जण ठार झाले, तर ३ जखमी झाले असल्याची माहिती चित्रदुर्ग पोलिसांनी दिली आहे.

शमसुद्दीन (४०), मल्लिका (३७) खलिल (४२) आणि तबरीज (१३) अशी मृतांची नाव आहेत. तर नर्गिस, रेहान, आणि रेहमान हे जखमी झाले असून त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हा अपघात इतका भयानक होता की कारचा चक्काचूर झाला आहे. कार हॉस्पेट येथून तुमकूरच्या दिशेने जात होती. या दरम्यान भरधाव कारने उभ्या असलेल्या लॉरी ट्रकला धडक दिली. यात चौघे ठार झाले. या प्रकरणी चित्रदुर्ग पोलीस तपास करत आहेत.

हे ही वाचा :

Back to top button