युद्धाच्या धुमश्चक्रीतच युक्रेनच्या संरक्षण मंत्र्यांची हकालपट्टी!, अध्यक्ष झेलेन्स्की म्हणाले...

पुढारी ऑनलाईन डेस्क : २४ फेब्रवारी २०२२ रोजी रशियाने युक्रेनवर हल्ला केला आणि दोन्ही देशांमध्ये युद्धाचा भडका उडाला. १९ महिन्यांनंतरही हा संघर्ष सुरुच आहे. युद्धाची रणधुमाळी सुरु असतानाच आता युक्रेनचे अध्यक्ष (Ukrainian President) झेलेन्स्की यांनी संरक्षण मंत्री ओलेक्सी रेझनिकोव्हा यांची पदावरुन हकालपट्टी केली आहे. आता त्यांच्या जागी रुस्तेम उमरोव्ह यांची नियुक्ती करण्यात आल्याचे त्यांनी जाहीर केले आहे, असे वृत्त ‘सीएनएन’ने दिले आहे.
Ukrainian President : रेझनिकोव्हा यांना पदावरून का हटवले?
युक्रेनचे अध्यक्ष लेनेस्की यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंट X वर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, “आता युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाचे नेतृत्त्व रस्तेम उमरोव्ह करतील. संपूर्ण युक्रेनला त्यांची ओळख असल्यामुळे त्यांच्या अधिक ओळख करुन देर्णंयाची गरज नाही. रेझनिकोव्ह यांनी ५५० पेक्षा अधिक दिवस युद्धभूमीवर नेतृत्त्व केले. संरक्षण मंत्रालयाला आता नवीन दृष्टिकोन आणि मोठ्या प्रमाणावर लष्कर आणि समाज या दोघांशी संवाद साधण्याची आवश्यकता आहे. संसद त्यांना पाठिंबा देईल अशी मी अपेक्षा करतो.”
युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयावर अनेक घोटाळ्याचे आरोप
युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयावर भ्रष्टाचाराच्या अनेक घोटाळ्यांचे आरोप झाले आहेत. संरक्षण मंत्री रेझनिकोव्ह हे थेट कोणत्याही घोटाळ्या गुंतले नसल्याले तरी या घोटाळ्यांमुळे लष्कराचे नुकसान झाल्याचे दिसून आले आहे. युक्रेनला नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन (नाटो) आणि युरोपियन युनियनमध्ये सदस्यत्व मिळविण्यासाठी युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयातील भ्रष्टाचाराचे उच्चाटन करणे गरजेचे आहे. त्यामुळेच संरक्षण मंत्री बदलाचा निर्णय घेतल्याचे ‘सीएनए’ने आपल्या वृत्तात म्हटलं आहे.
युक्रेन हा युरोपमधील दुसरा सर्वात भ्रष्ट देश
‘ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल’च्या २०२१ च्या अहवालानुसार, रशियानंतर युक्रेन हा युरोपमधील दुसरा सर्वात भ्रष्ट देश आहे. जागतिक स्तरावर, ते 180 देशांपैकी युक्रेन भ्रष्टाचारामध्ये 122 व्या क्रमांकावर आहे. 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत युक्रेनला भ्रष्टाचार मुक्त करणार असे, आश्वासन देवून झेलेन्स्की यांनी सत्ता काबीज केली होती.
Ukrainian President Zelensky dismisses Defense Minister Reznikov, saying “new approaches” are needed as the war with Russia enters its 19th month.https://t.co/V7H74x3Szo
— CNN (@CNN) September 3, 2023
हेही वाचा :
- पाकिस्तानकडून युक्रेनला शस्त्र पुरवठा! रशियाचे राजदूत म्हणाले, “याची आम्ही …”
- युद्धात युक्रेनची आगेकूच : क्रिमियात पोहोचली युक्रेनची सेना, बलाढ्य रशिया बॅकफूटवर | Ukraine troops in Crimea