सांगली : जालना लाठीमाराच्या निषेधार्थ आमणापूर बंद, सकल मराठा समाजाच्या बंदला सर्व स्तरातून पाठिंबा | पुढारी

सांगली : जालना लाठीमाराच्या निषेधार्थ आमणापूर बंद, सकल मराठा समाजाच्या बंदला सर्व स्तरातून पाठिंबा

पलूस; पुढारी वृत्तसेवा जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे- पाटील यांना पाठिंबा देणाऱ्या आंदोलकांवर ताबड अंतरवाली सराटी गावात पोलिसांकडून लाठीचार्ज झाला होता. यानंतर मराठा आंदोलन आणखी आक्रमक झाले आहे.

मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलनकर्त्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याने राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. या घटनेनंतर शासन आणि पोलिस प्रशासनाचा निषेध व्यक्त केला जात आहे.

आज (रविवार) समस्त मराठा समाज आणि शिवप्रतिष्ठान आमणापूर यांच्या वतीने पुकारलेल्या आमणापूर बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

आज सकाळपासून जालना लाठीचार्जच्या निषेधार्थ संपुर्ण आमणापूर कडकडीत बंद ठेवण्यात आले आहे. सकल मराठा समाजाच्या बंदला सर्व स्तरातून पाठिंबा मिळत आहे. सकाल मराठा समाज व शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी सकाळी चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर एकत्र येत जालना घटनेच्या निषेधार्थ घोषणा दिल्‍या. मराठा आरक्षणासाठी सकल मराठा समाज यापुढे संघटीतपणे लढत राहणार असल्याचे यावेळी आंदोलकांनी सांगितले.

हेही वाचा : 

Back to top button