मराठा आंदोलकांवर लाठीमार : सखोल चौकशीची पंकजा मुंडेंची मागणी

मराठा आंदोलकांवर लाठीमार : सखोल चौकशीची पंकजा मुंडेंची मागणी

परळीवैजनाथ, पुढारी वृत्तसेवा :  मराठा आंदोलकांवर लाठीमार झाला आणि ते जखमी झाले हे अत्यंत दुर्दैवी आहे. याची दखल शासनाने तात्काळ घ्यावी. या प्रकरणाची सखोल आणि निःपक्षपातीपणे चौकशी व्हावी अशी प्रतिक्रिया भाजप राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली आहे. त्यांनी आपल्या एक्स खात्यावर (ट्विटर) एक ट्विट करून त्यांनी ही मागणी केली आहे.

जालना जिल्ह्यातील शहागड येथे मराठा आक्रोश आंदोलन झाले. यानंतर अंबड तालुक्यात येणाऱ्या अंतरवाली येथे २९ ऑगस्ट २०२३ पासून मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरू आहे. या आंदोलना दरम्यान जरांगे पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेत एक तर मराठा आरक्षणाची विजयी यात्रा निघेल किंवा माझी अंत्ययात्रा असे जाहीर केले. यानंतर महाराष्ट्रातील मराठा समाज भावनिक झाला असून आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून लोक आंदोलन स्थळी दाखल होत आहेत. या दरम्यान शुक्रवारी (दि.१) सायंकाळी ६  च्या दरम्यान अचानक पोलीसांकडून आंदोलकांवर आश्रु धुराच्या नळकांड्या फोडत, अमानुष लाठीचार्ज करण्यात आला. या घटनेचा पंकजा मुंडे यांनी निषेध केला आहे. याबाबत ट्विट करत पंकजा मुंडेंनी मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज झाला आणि ते जखमी झाले हे अत्यंत दुर्दैवी आहे. याची दखल शासनाने तात्काळ घ्यावी. या प्रकरणाची सखोल आणि निःपक्षपातीपणे चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news