छत्रपती संभाजीनगर: लोहगाव येथे विद्युत तारेवरील कावळा काढताना वायरमनचा मृत्यू | पुढारी

छत्रपती संभाजीनगर: लोहगाव येथे विद्युत तारेवरील कावळा काढताना वायरमनचा मृत्यू

पैठण, पुढारी वृत्तसेवा: विद्युत तारेवरील कावळा काढताना विजेचा जोराचा धक्का लागून एका वायरमनचा मृत्यू झाला. ही घटना पैठण तालुक्यातील लोहगाव येथे मंगळवारी (दि.२९) सकाळी घडली. श्रीपाद राजाराम भोंडे (वय ३५, रा. पाटेगाव, ता. पैठण) असे मृत्यू झालेल्या वायरमनचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, लोहगाव येथे विद्युत तारेवर कावळा लटकला होता. त्यामुळे संभाव्य धोका टाळण्यासाठी येथे कार्यरत असलेले वायरमन श्रीपाद भोंडे लोखंडी रॉडच्या साह्याने कावळा काढत होते. यावेळी त्यांना विजेचा जोराचा धक्का बसला. त्यांना ग्रामस्थांनी बिडकीन येथील शासकीय रुग्णालयात नेले. परंतु, वैद्यकीय अधिकारी यांनी तपासून मृत घोषित केले.

या घटनेनंतर सहायक पोलीस निरीक्षक गणेश सुरासे, महावितरणचे कार्यकारी अभियंता विष्णू ढाकणे, ढाकेफळ विभागाचे तावरे यांनी रुग्णालयात जाऊन पंचनामा केला.

हेही वाचा 

Back to top button