छ. संभाजीनगर: मराठा समाजाच्या मागण्यांसाठी पुकारलेल्या विहामांडवा बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद | पुढारी

छ. संभाजीनगर: मराठा समाजाच्या मागण्यांसाठी पुकारलेल्या विहामांडवा बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

पैठण पुढारी वृत्तसेवा : शहागड येथील जनआक्रोश आंदोलनात करण्यात आलेल्या मागण्या पूर्ण न झाल्यामुळे अंतरवाली सराटी (ता. अंबड) येथे मनोज जरांगे- पाटील उपोषणाला बसले आहेत. त्यांना पाठिंबा देण्यासाठी शुक्रवारी (दि.१) मराठा समाजाच्या वतीने विहामांडवा बंद पुकारण्यात आला. या आवाहनाला येथील व्यापारी बांधवाने मोठा प्रतिसाद देऊन व्यवहार बंद ठेवले. याप्रसंगी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली.

दोन दिवसांपूर्वी शहागड पैठण रोडवर मराठा समाजाच्या विविध मागण्यासाठी जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी मराठा समाजाच्या वतीने करण्यात आलेल्या मागण्या पूर्ण न झाल्यामुळे मनोज जरांगे- पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केलेले आहे. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी विहामांडवा बंद ठेवण्याचे आवाहन केले होते. या बंदला विविध व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

बंद काळात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी ग्रामीण पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया, अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सिद्धेश्वर भोरे, सपोनि संतोष माने, विहामांडवा पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक नितीन काकरवल, जमादार किशोर शिंदे, तळपे, अभिजीत सोनवणे यांनी चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.

हेही वाचा 

Back to top button