बीड : केज येथील उमरी फाट्यावर भीषण अपघात : रस्ता ओलांडणारी महिला जागीच ठार ! | पुढारी

बीड : केज येथील उमरी फाट्यावर भीषण अपघात : रस्ता ओलांडणारी महिला जागीच ठार !

केज; पुढारी वृत्तसेवा : केज-बीड रोडवर गंगा माऊली साखर कारखान्याजवळ असलेल्या उमरी फाट्यावर बीड येथील दवाखाण्यातून रुग्णाला घेऊन अंबाजोगाईकडे जाणाऱ्या भरधाव कार क्र. (एम एच-४४/एस/१६४४) ने मंगळवारी (दि.२९) रोजी रात्री ८:३० वा. सुमारास रस्ता वैजयंती शिंदे (रा. उमरी पाटी) या रस्ता ओलांडणाऱ्या  महिलेस जोराची धडक दिली. या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू झाला.

या धडकेत वैजयंती शिंदे या जागीच ठार झाल्या. अपघाताची माहिती मिळताच केज पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक वैभव सारंग, उमेश आघाव आणि राम भंडाने यांनी धाव घेतली. यावेळी अपघातातील कार ताब्यात घेत पोलीस स्टेशनला आणण्यात आली.

हेही वाचा;

Back to top button