बीड : अंबाजोगाईत तरूण शेतकर्‍याचा मुलाकडूनच खून | पुढारी

बीड : अंबाजोगाईत तरूण शेतकर्‍याचा मुलाकडूनच खून

अंबाजोगाई, पुढारी वृत्तसेवा : आईवर नेहमी चारित्र्यावरुन संशय घेत असलेल्या बापाचा त्याच्या १७ वर्षीय मुलानेच खून केल्याची घटना घडली. बापाच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करुन मुलाने बापाचा खून केला आहे. ही घटना अंबाजोगाई तालुक्यातील पुस गावालगत असलेल्या शेतामध्ये बुधवारी (दि.१७)  रात्री दीड वाजता घडली. साहेब जानुखाँ पठाण (वय ४२) असे खून झालेल्या तरूण शेतकर्‍याचे नाव आहे. या प्रकरणी शमिमबी साहेब पठाण (वय ३९) यांच्या फिर्यादीवरून बर्दापुर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबतची अधिकची माहिती अशी की, साहेब पठाण हे त्यांच्या पत्नी आणि मुलांवर चारित्र्यावर संशय घेऊन शिवीगाळ करत होते. शिवाय ते मुलांना रोज दारु पिऊन मारहाण देखील करत असत. त्यांचा मुलगा साहिल याने १६ ऑगस्ट रोजी संध्याकाळी जेवणासाठी फोनकरुन बोलावले. त्यावेळी साहेब पठाण यांनी मी शेतात जेवणार असल्याचे सांगितले.  साहिल याने डब्बा तयार करून छोटा भाऊ तोहित याच्याजवळ पाठविला. मात्र, साहेब पठाण यांना मलाने जेवण नेले तेव्हा ते मद्यधुंद अवस्थेत होते.
यावेळी ते आईला आणि मुलांना शिवीगाळ करु लागले.  वडील मारू लागल्यामुळे मुलगा तोहित याने पत्र्याच्या शेडवरील कुर्‍हाड घेवून वडीलांच्या डोक्यात चेहर्‍यावर व मानेवर मारून गंभीर जखम केली. त्यानंतर मोठा मुलगा साहिल, सोहेल शेतात पळत गेले असता शेतातील पत्र्याच्या शेडसमोर जखमी अवस्थेत पठाण पडलेले दिसले.  साहेब पठाण यांना अंबाजोगाईच्या स्वाराती रूग्णालयात रूग्णवाहिकेद्वारे घेवून गेले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सरपंचाने बर्दापुर पोलिसांना माहिती देत पोलिसांनी घटनास्थळाला भेट देवून पंचनामा करून तपासाची चक्रे फिरविली. सकाळी 7 च्या सुमारास चौकशीसाठी बोलवलेल्या चौघांपैकी  एका त्यांच्याच मुलाने खून केल्याची पोलिसांना जवाबात सांगितले. या खूनाची घटना घडल्यानंतर तालुक्यात मोठी खळबळ उडाली होती.

हेही वाचलंत का?

Back to top button