Tejaswini Pandit : तेजस्विनीची तुलना थेट 'चांद्रयान-२' ने टिपलेल्या दृश्यांशी, मिश्किल कॉमेंटने नेटकऱ्याने वेधलं लक्ष | पुढारी

Tejaswini Pandit : तेजस्विनीची तुलना थेट 'चांद्रयान-२' ने टिपलेल्या दृश्यांशी, मिश्किल कॉमेंटने नेटकऱ्याने वेधलं लक्ष

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने साडीतला एक फोटो शेअर केला आहे. (Tejaswini Pandit) शेवाळी रंगाच्या साडीवर हातात भरगच्च बांगड्या, स्टोन इअरिंग्ज आणि सुंदर हास्याने तेजस्विनीने सर्वांना मोहून टाकले आहे. नेटकऱ्यांनी तिच्या सौंदर्याचे कौतुक तर केले आहेच. पण, एका नेटकऱ्याने तिच्या फोटोला दिलेली कॉमेंट लक्ष वेधून घेत आहे. (Tejaswini Pandit) एका सोशल मीडिया युजरने तिच्या फोटोची तुलना इस्रोकडून चांद्रयान-२ ने टिपलेल्या चंद्राच्या काही दृश्यांशी केल्याने तिची चर्चा होतेय.

एका सोशल मीडिया युजरने तेजस्विनीच्या फोटोंची तुलना करताना म्हटले आहे- इस्रोने चंद्रयान-2 ने टिपलेल्या चंद्राची काही दृश्ये प्रसिद्ध केली आहेत…. 😍😍, दुसऱ्या एकाने लिहिलंय- परी म्हणाव की अप्सरा.., आणखी एकाने भैरवी❤️ असे म्हटले आहे. तर आणखी काही युजर्सनी फायर, हार्ट इमोजी शेअर केल्या आहेत.

अग्गबाई अरेच्चा, ये रे ये रे पैसा, समांतर, रानबाजार, तू हि रे यासारख्या अनेक चित्रपटांत ती दिसली होती. आदिपुरुषमध्ये रावणची बहिण ‘शूर्पणखा’ची भूमिका मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडितने साकारले आहे.

Back to top button