हिंगोली : डोंगरकडा येथे गोठयाला आग; गाईचा जागीच मूत्यु तर वासरू सुखरुप | पुढारी

हिंगोली : डोंगरकडा येथे गोठयाला आग; गाईचा जागीच मूत्यु तर वासरू सुखरुप

कळमनुरी (हिंगोली), पुढारी वृत्‍तसेवा : कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा येथील शेतकरी दत्तरामजी सारंगे यांच्या सर्वे नंबर 113 बट्टे 5 मधील असलेल्या आखाड्यावर काल मध्यरात्री अचानक लागलेल्या आगीत एका गायींचा जागीच मृत्यू तर लाखो रुपयांचे शेतीचे सामान स्पिंकलर पाईप संच, ठिबक सिंचन, नांगर, वखर, सहा कुंट्टल लसण, मोठ मोठ्या पाच ताडपत्री, सह चार ते पाच लाख रुपयाचे नुकसान झाले आहे.

अचानक लागलेल्या आगीची माहिती नसल्यामुळे रात्रभर गाईसह सर्व साहित्य जळून खाक झाले होते. सकाळी नेहमीप्रमाणे शेतकरी गाईचे दूध काढण्यासाठी शेतात गेला असता हा प्रकार त्यांच्या उघडकीस आला. डोंगरकडा तलाठी व मंडळ अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करून अहवाल सादर करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. तसेच झालेल्या नुकसानाची चौकशी करून शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी होत आहे.

.हेही वाचा 

नाशिक : विंचूरला वीजचोरांना दहा लाखांचा दंड

परभणी : डुघरा येथील शिंदे बंधूंचा आंतरराष्ट्रीय पुरस्काराने गौरव; पीएम कुसुम योजनेद्वारे शेतकऱ्यांना मदत

पुण्यातून परदेशात चालली पहिली काच प्रतिमा

Back to top button