बाप म्हणून कर्तव्य पार न पडल्याने मुलाने केला गोळीबार | पुढारी

बाप म्हणून कर्तव्य पार न पडल्याने मुलाने केला गोळीबार

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : बापाने तीन लग्न केले. पहिल्या पत्नीच्या मुलांना सांभळले नाही, पत्नीचे निधन झाले तर अंत्यविधीला आला नाही, मुळात वडीलांनी बाप म्हणून कर्तव्य पार न पडल्याने मुलाने थेट बापावर गोळीबार केला. ३१ जुलैला न्यू हनुमान नगरमध्ये ही घटना घडली होती. पोलिसांनी तपास करून मुलासह त्याच्या साथीदाराला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, महादू प्रभू आहिरे, असे मुलाचे नाव आहे. प्रभू आनंदा आहिरे असे वडीलांचे नाव आहे. प्रभू आहिरे हे मनपात सफाई कामगार होते. एप्रिल महिन्यात निवृत्त झाले होते. त्यांच्या जागी महादुला नोकरी मिळावी, असे त्याला वाटत होते. मात्र, प्रभू आहीरे यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे त्याने आठ दिवसांपूर्वी रेकी करून बापावर गोळीबार करून खून केला. या प्रकरणाचा पोलीस पुढील तपास करत आहे.

.हेही वाचा 

दौंडच्या महाबँकेतील घोटाळेबाज कंत्राटी शिपाई अखेर अटकेत

अण्णा भाऊ साठे यांच्या मुंबई येथील स्मारकाचा आराखडा नव्याने तयार करू : उपमुख्यमंत्री फडणवीस

Umangot River : ‘इथे’ होडी जणू काही हवेतच तरंगते!

Back to top button