Morari Bapu : प्रसिद्ध कथाकार मोरारी बापू यांनी घेतले वैद्यनाथाचे दर्शन
परळी वैजनाथ, पुढारी वृत्तसेवा : रामचरितमानस या ग्रंथाचे प्रसिद्ध कथाकार मोरारी बापू यांनी आज (दि.३१) परळी शहरातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेतले. यावेळी कृषीमंत्री धनंजय मुंडे उपस्थित होते.
कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी मोरारी बापू यांचे परळी वैद्यनाथ रेल्वे स्थानकावर स्वागत केले. तसेच स्वतः वाहनाचे सारथ्य करत ते मोरारी बापू यांच्या समवेत वैद्यनाथ मंदिरात दर्शनावेळी उपस्थित होते.
रामचरितमानस या ग्रंथाचे प्रसिद्ध कथाकार मोरारी बापू हे तब्बल ९६० भक्तगणांसह देशातील बारा ज्योतिर्लिंगांच्या यात्रेवर असून त्यासाठी दोन विशेष रेल्वे गाड्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. दरम्यान आज तिरुपती बालाजी येथील दर्शन करून पहाटे सहाच्या सुमारास मोरारी बापू यांची ट्रेन परळी वैद्यनाथ येथे पोहोचली. धनंजय मुंडे यांनी मोरारी बापू यांना दर्शनासोबतच संपूर्ण मंदिर परिसर दाखवून त्याबद्दल माहिती दिली. यावेळी नमामी वैद्यनाथम व हर हर महादेवच्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेला होता. दरम्यान, दर्शन करून पुढील प्रवासासाठी निघाताना मोरारी बापू यांनी आपल्याला राम कथेसाठी परळीत येण्याचे निमंत्रण दिले असून, लवकरच कथेसाठी परळीत येणार असल्याचे सांगितले.
यावेळी ज्येष्ठ नेते वाल्मिक अण्णा कराड, श्री वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टचे सचिव बाबासाहेब देशमुख, विश्वस्त राजेश देशमुख, प्रा. प्रदिप देशमुख, विजयकुमार मेनकूदळे, नंदकिशोर जाजू, अनिल तांदळे, डॉ. गुरुप्रसाद देशपांडे, शरद मोहरीर, नागनाथ देशमुख, रघुनाथ देशमुख, अनिल पुजारी यांच्यासह माजी नगराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी, राजेंद्र सोनी, सुरेश टाक, नितीन कुलकर्णी आदींसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा :