Chandrakant Patil : आगामी निवडणुका भाजप स्वबळावर लढणार | पुढारी

Chandrakant Patil : आगामी निवडणुका भाजप स्वबळावर लढणार

औसा : पुढारी वृत्तसेवा

आगामी काळात होणार्‍या महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीसह इतर निवडणुका भाजप कुणालाही सोबत घेवून लढणार नाही. या निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी सांगितले.
औसा विधानसभा मतदारसंघाचे आमदारअभिमन्यू पवार यांच्या घरी सदिच्छा भेट दिल्यानंतर प्रदेशाध्यक्ष (President of Maharashtra BJP) चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. मराठवाड्यातील शेतकर्‍यांना दिवाळीच्या शुभेच्छा कशा द्याव्यात. कारण पुन्हा एकदा येथील शेतकरी संकटात आहे. अतिवृष्टीने 38 लाख हेक्टर पिके व 11 लाख हेक्टर जमीन वाहून गेली. अशा गंभीर परिस्थितीत असणार्‍या शेतकर्‍यांना सरकारने आजपर्यंत खडकूही दिले नाही. कारण शेतकर्‍यांपेक्षा शाहरूखच्या मुलगा महत्वाचा असल्याची खोचक टिका त्यांनी केली.

लातूरसह औसा विधानसभा क्षेत्रातील परिस्थिती सरकारपर्यंत पोहचविण्यासाठी आ. पवार यांनी पदयात्रा काढून सरकारला शेतकर्‍यांविषयी सद्दबुध्दी देण्याचे साकडं घातले. पण अद्यापही सरकारला जाग आली नाही, असे ते म्हणाले. राज्य सरकारने महानगरपालिकेसह नगरपालिकेची वाढवलेली सदस्यसंख्या चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितले.

औसा विधानसभा मतदारसंघाचे आ. अभिमन्यू पवार यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. पवार कुटुंबीयांच्या आदरातिथ्याने भारावून गेलो. अभिमन्यूजींचे वडील वारकरी आहेत. त्यांचे वारीतील अनुभव ऐकताना मनाला एक वेगळेच समाधान मिळाले.
– चंद्रकांत पाटील (President of Maharashtra BJP)

हे ही वाचा :

Back to top button