Nawab Malik : 'होय मी भंगारवाला! एक एक नटबोल्ट काढून भट्टीत टाकणार' - पुढारी

Nawab Malik : 'होय मी भंगारवाला! एक एक नटबोल्ट काढून भट्टीत टाकणार'

पुढारी ऑनलाईन डेस्क

ड्रग्ज प्रकरणी पुन्हा एकदा मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी आज शुक्रवारी आरोपांच्या फैरी झाडल्या. भाजपचे मोठे मोठे नेते एनसीबीच्या कार्यालयात जातात. भाजपचे राईट हँड समीर वानखेडेंना भेटतात, असे अनेक गंभीर आरोप करत मलिक यांनी हिंवाळी अधिवेशनात मोठी नावे समोर येणार असल्याचा इशारा दिला. काशिफ खानचे ड्रग्जचे धंदे असून काशिम खान हा समीर वानखेडेंचा मित्र आहे. काशिफ खानची पार्श्वभूमी ड्रग्ज रॅकेटची आहे. काशिफ खान यांच्यावर कारवाई करण्यास समीर वानखेडे यांनी रोखलं. काशिफला अटक केल्यानंतर भाजपचं पितळ उघडं पडेल, असा दावा त्यांनी केला आहे.

निरपराध लोक तुरुंगातून बाहेर येतील. तेव्हाच पिक्चरचा शेवट होईल. होय मी भंगारवाला आहे. मी गोल्ड स्मगलर नाही. या शहरातील एकेक भंगाराचा एक एक नटबोल्ट काढून भट्टीत टाकल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा नवाब मलिक (Nawab Malik) यांनी दिला आहे.

आर्यन खानला नेणारी व्यक्ती आता जेलमध्ये आहे. घोसावी आणि भाजपची पार्टनरशीप आहे, असा आरोपही त्यांनी केला. समीर वानखेडे यांच्या पहिल्या पत्नीचा फोटो सोशल मीडियावर टाकला. पण आताच्या पत्नीच्याबद्दल कसलीही टिप्पणी केली नाही. माझी लढाई कुटुंब अथवा धर्माविरोधात नाही. तर अन्यायाविरोधात आहे, असे मलिक यांनी म्हटले आहे.

कुटुंबियांना गोवण्याचा समीर वानखेडेंचा आरोप चुकीचा असल्याचा दावा त्यांनी केला आहे. एनसीबीला दिलेल्या २६ प्रकरणांची चौकशी व्हावी. स्वतंत्र भारतात कोणालाही बोलण्यापासून रोखू शकत नाही, असेही ते म्हणाले. बॉलिवूडला बदनाम करून ते मुंबईतून बाहेर नेण्याचा डाव असल्याचा आरोपही त्यांनी केला. निरपराध लोक तुरुंगातून बाहेर येतील. तेव्हाच पिक्चरचा शेवट होईल, असेही त्यांनी सांगितले.

हे ही वाचा :

Back to top button