औंढा नागनाथ – पुढारी वृत्तसेवा – येथे अनेक दिवसांपासून हिंगोली परभणी हायवे रोडवर बाजूस व पर्यटन परिसरात अनेक दिवसांपासून मच्छी व चिकन विक्री होत होते. त्यामुळे येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांस व येणाऱ्या भाविक भक्तास त्रास होत असल्याचे कारण देत औंढा नगरपंचायतीकडून सदर ठिकाणी मच्छी मार्केट व चिकन असे दुकान चालू करू नयेत अशा नोटिसा दिल्या होत्या. वारंवार सांगूनही व्यापारी ऐकत नव्हते. आज चौथ्यांदा नगर पंचायतीकडून काही दिवसांपूर्वी नोटीस देऊन दहा तारखेला अतिक्रमण काढून घेण्यात यावे असे सांगूनही अतिक्रमंधारकांनी अतिक्रमणे काढून न घेता तिथेच व्यवसाय सुरू ठेवला. आज पोलीस प्रशासनाच्या मदतीने सदर अतिक्रमण काढण्यासाठी पथक पाठविण्यात आले. त्यातील काही लोकांनी आपण आपल्या स्वतःच्या जागेत व्यवसाय करत असल्याचे सांगत हुज्जत घातल्याची माहिती समजते.
सदर अतिक्रमण हटविण्यासाठी औंढा नगरपंचायतीचे मुख्य नगराधिकारी तसेच नगरपंचायत कर्मचारी यांच्यासह पोलीस निरीक्षक गणपतराव राहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक ठोंबरे साहेब तसेच जमादार अफसर खा पठाण यांनी भूमिका बजावली.
आजपर्यंत या रस्त्यावरील फक्त मटण व मच्छीमार दुकानेच अतिक्रमण म्हणून उठवले आहेत. इतर दुकानाचे अतिक्रमण का काढण्यात आली नाहीत, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.