पुणे : विनयभंगप्रकरणी 7 जण ताब्यात; तिघे फरार | पुढारी

पुणे : विनयभंगप्रकरणी 7 जण ताब्यात; तिघे फरार

भोर : पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील महाविद्यालयीन तरुणीचा विनयभंग करून मारहाण करणार्‍या तरुणांना भोर पोलिसांनी शुक्रवारी (दि. 23) सकाळी अटक केली. यामधील मुख्य संशयितासह तीनजण अद्याप फरार असून, 7 जणांना 3 दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली. रोहित हनुमंत शिंदे (वय 23), प्रतीक दत्तात्रय दुधाळ (वय 22, रा. वेनवडी), प्रवीण ऊर्फ सोन्या अनिल बांदल (वय 23, रा. खानापूर, ता. भोर), मयूर संजय साळेकर (21, रा. विंग, ता. खंडाळा, जि. सातारा), तुषार ऊर्फ चिक्या रवींद्र शिवतरे (वय 24, रा. उत्रौली, ता. भोर), संकेत संजय शिर्के (वय 26, रा. भोलावडे, ता. भोर), समीर कैलास जाधव (वय 27, रा. मोरगाव, ता. बारामती) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. मुख्य संशयित अक्षय किसन शिंदे (रा. वेनवडी, ता. भोर), आदील जमादार (रा. संजयनगर, भोर) आणि बाबू शिंदे (रा. वेनवडी) हे तिघे फरारी असल्याचे पोलिसांनी सांगितले.

याबाबत माहिती अशी की, अक्षय शिंदे याने मागील पंधरवड्यात तरुणीच्या घरी व महाविद्यालयाच्या रस्त्यावर वेळोवेळी तिचा विनयभंग केला आणि इतर 9 जणांनी रस्त्यावर मुख्य आरोपींसह तरुणीचा पुन्हा एकदा विनयभंग केला. तरुणांच्या त्रासाला कंटाळून संबंधित तरुणी तिच्या महाविद्यालयातील व्दितीय वर्षांच्या एका पेपरलादेखील गेली नाही. शनिवारी (दि. 17) या तरुणीने विषारी औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्नही केला होता. रविवारी (दि. 18) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास सर्व संशयित तरुणांनी मुलीच्या मानलेल्या भावाला मारहाणही केली. त्यामुळे तरुणीने त्यांच्या विरोधात रविवारी सायंकाळी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.

पोलिस अंमलदार राहुल मखरे व वर्षा भोसले यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन संबंधित तरुणीची फिर्याद घेतली. त्यानुसार पोलिसांनी 10 जणांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला व त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर शुक्रवारी (दि. 23) सकाळी सातही आरोपींना न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. भोरच्या परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक रेखा वाणी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक बळीराम सांगळे या घटनेचा तपास करीत आहेत.

हे ही वाचा :

पुणे : सासवड येथे बोगस फायनान्स एजंटचे रॅकेट उघड

पुणे : जमाबंदी आयुक्तालयात ‘तलाठी भरती कक्ष’

Back to top button