

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवडमधून कामानिमित्त पीएमपी बसमधून पुण्यात जाणार्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. जलद तसेच विनाअडथळा प्रवासासाठी बीआरटी मार्ग तयार करण्यात आले असून, या मार्गातील बसमधून प्रवास करताना चालकांच्या दुर्लक्षामुळे प्रवाशांना दुखापतीच्या घटना घडत आहेत. दररोज कामानिमित्त पुण्यात जाणार्या प्रवाशांकडून पीएमपीची बससेवा सर्वांना सोयीचे आहे. यामध्ये विद्यार्थी, नोकरीसाठी जाणार्यांची मोठी गर्दी असते. तसेच विविध कामानिमित्त जाणार्यांची संख्याही मोठी आहे.
प्रवास विनाअडथळा व्हावा म्हणून बीआरटी मार्गातून बस नेल्या जातात; मात्र थांब्यावर प्रवासी चढ-उतार करताना अनेकदा चालकांच्या अतिघाईमुळे अथवा दुर्लक्षामुळे प्रवाशांना दुखापतीच्या घटना घडत आहेत. काही प्रवाशांना दरवाजांचा मार लागत आहे, तर मागील आठवड्यात एका महिलेचा हात बसच्या दरवाजात अडकण्याची घटना घडली होती. अतिघाई करणार्या चालकांमुळे प्रवाशांना किरकोळ जखमा होत आहेत; मात्र चालकांच्या अतिघाईमुळे एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
बसथांब्यावर प्रवासी व्यवस्थित चढले अथवा उतरले की नाही, याची खात्री न करताच चालक निष्काळजीपणे दरवाजा बंद करतात. त्यामुळे दरवाजामध्ये प्रवाशांचा हात अडकणे अथवा दरवाजाचा मार बसणे अशा घटना घडतात. या घटना घडू नये, यासाठी बसेसच्या चालकांनी दुर्लक्ष न करता योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे.
-दीपक कांबळे, प्रवासी निगडी.
हेही वाचा