मृग नक्षत्रात तापमानात मोठ्याप्रमाणात वाढ | पुढारी

मृग नक्षत्रात तापमानात मोठ्याप्रमाणात वाढ

जवळाबाजार(हिंगोली), पुढारी वृत्‍तसेवा : खरीप हंगामातील पेरणीयोग्य पावसाची शेतकरी बांधव करत असताना मृग नक्षत्र जवळपास आठ दिवस सुरू होऊन सुध्दा पावसाचे आगमन झाले नाही. उलट सध्याच परिस्थितीत तापमानात मोठ्याप्रमाणात वाढ होत आहे.

दिनांक ७ जुन रोजी मृग नक्षत्रास सुरुवात झाली. या वर्षांत मृग नक्षत्र मध्ये खरीपातील हंगामातील पेरणी होईल. या आशेवर शेतकरी बांधव कडून शेतीची मशागत करून खरीपातील पेरणीचा बियाणे व खत खरेदीस सुरूवात केली आहे. पण मृग नक्षत्र जवळपास आठ दिवसापासून सुरूवात झाली. तरी वरूनराजाचे आगमन झाले नाही. यामुळे या वर्षांत खरीपातील पेरणी मृग नक्षत्रात होणार नाही.

दरम्‍यान, अशी परिस्थितीत सध्याच तापमान वाढ होत असल्याने वाटत आहे. परिसरात बागायतदार क्षेत्र मोठ्याप्रमाणात असून सध्याच परिस्थितीत पाणी साठा उपलब्ध असल्याने खरीपातील बागायतदार कापसाची लागवड करण्यात आली. पण सध्याच परिस्थितीत मागील दोन दिवसापासून तापमानात मोठ्याप्रमाणात वाढ होत असून दररोजच तापमान ४०अंश सेल्सियस होत आहे. शेतकरी बांधव आकाशाकडे डोळे लावून बसलेले असून वरूणराजाची प्रतिक्षा करत आहेत. एकंदरीत मृग नक्षत्र सुरूवात होऊन सुध्दा मोठ्याप्रमाणात तापमानात वाढ पहावयास मिळत आहे.

-हेही वाचा 

Nashik : यंदा श्रावणाचे आठ सोमवार, त्र्यंबकेश्वरला भाविकांचा ओघ वाढणार

नगर : गावातच अडला ‘जलयुक्त’चा गाडा ! 253 ग्रामपंचायतींनी आराखडे बनविण्याला दाखविला निरूत्साह

यवतमाळ: शेतरस्त्याच्या वादातून वृद्ध शेतकऱ्याचा खून

Back to top button