Nashik : यंदा श्रावणाचे आठ सोमवार, त्र्यंबकेश्वरला भाविकांचा ओघ वाढणार | पुढारी

Nashik : यंदा श्रावणाचे आठ सोमवार, त्र्यंबकेश्वरला भाविकांचा ओघ वाढणार

त्र्यंबकेश्वर : पुढारी वृत्तसेवा

पुढील महिन्यात अधिकमास आणि श्रावण मास जोडून येत असून प्रदीर्घ पर्वकाळ लाभल्याने यंदा श्रावणाचे आठ सोमवार राहणार असल्याने त्र्यंबकेश्वरला भाविकांचा ओघ वाढणार आहे.

त्र्यंबकेश्वरला अधिक महिन्यात भाविकांची संख्या वाढते. तशात श्रीमत भागवत कथा पुराण यासाठी त्र्यंबकला प्राधान्य दिले जाते. येथे मुक्कामी राहणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते. येथील यात्रा काळात सोयीसुविधा, सुरक्षा यासाठी शासन यंत्रणांनी पूर्वनियोजन करण्याची आवश्यकता आहे. मात्र, अद्यापपर्यंत शासन यंत्रणेकडून कुठलीही तयारी सुरू करण्यात आलेली नाही. मान्सून उंबरठ्यावर आला आहे. पावसाळ्यात ब्रह्मगिरी पर्वतावर दरडी कोसळणे, दगड कोसळण्याच्या घटना घडत असताता. गत महिन्यात डोक्यात दगड कोसळून भाविकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. त्यामुळे श्रावण आणि अधिक मास या काळात भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता शासन यंत्रणांनी भाविकांच्या सोयीसाठी तसेच सुरक्षेसाठी तयारी करणे आवश्यक आहे. याकडे वनखात्यानेही लक्ष देण्याची गरज आहे. स्थानिक वन व्यवस्थापन समितीमार्फत वनखाते भाविकांना ब्रह्मगिरीवर जाण्यासाठी 30 रुपये फी आकारते. मात्र भाविकांच्या सुरक्षेबाबत बेफिकीर आहे.

3 जुलै ते 14 सप्टेंबर प्रदीर्घ पर्वकाल

दि. 3 जुलै 2023 रोजी गुरुपौर्णिमा म्हणजेच आषाढी पौर्णिमा आहे. त्यानंतर उत्तर भारतीयांचा श्रावण सुरू होतो. तसेच आषाढवारीला पंढरपूरला गेलेले भाविक परत फिरतात. येणारे बहुसंख्य भाविक गोदावरीच्या उगमस्थानी ब्रह्मगिरी व गंगाद्वार येथे जातात. यावर्षी अधिक श्रावण मास आहे. अधिक मासाचा प्रारंभ मंगळवारी (दि. 18) होत आहे. अधिक मास संपताच दि. 17 ऑगस्ट 203 रोजी श्रावण महिना प्रारंभ होईल. त्यामुळे यंदा 3 जुलै ते 14 सप्टेंबर असा 73 दिवसांचा प्रदीर्घ पर्वकाल आहे. अधिक श्रावण आणि मूल श्रावण महिना असे यावर्षी आठ श्रावण साेमवार पर्वकाल असतील.

हेही वाचा :

Back to top button