तुळजापूर; पुढारी वृत्तसेवा : तुळजाभवानी देवीच्या मंदिरात भाविकांनी अर्पण केलेल्या सोन्या-चांदीच्या वस्तूची वितळवण्याची प्रक्रिया दि. ७ जूनपासून सुरु करण्यात आली आहे. देवीच्या सोन्या चांदीच्या मोजमापामध्ये आजच्या (दि. १०) चौथ्या दिवशी ३४८ हिरे आढळून आले. विशेष म्हणजे यामध्ये २४ कॅरेट हिऱ्यांचा हार सापडला आहे. आजच्या (दि. १०) चौथ्या दिवशी पाच वाजेपर्यंत २६ किलो सोने मोजून झाले. याची बाजारभावातील किंमत ६५ कोटी रुपये एवढी झाली आहे. (Tulja Bhavani Temple)
आयकर खात्याच्या वतीने नियुक्त केलेले मूल्यांकन अधिकारी सिद्धेश्वर काळे यांनी दिलेल्या माहितीनुसार तुळजाभवानीचे हे देवस्थान महाराष्ट्रातील अत्यंत श्रीमंत देवस्थान आहे. सोन्या चांदीच्या वाहक वस्तू मोजमाप करण्याची प्रक्रिया आणखी महिनाभरापर्यंत सुरू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. सुमारे चार हजार किलो चांदी देवीला अर्पण झालेले आहे, त्याची मोजमाप अद्याप झालेली नाही. देवस्थान समितीने नियुक्ती केलेली कर्मचाऱ्यांची टीम अत्यंत चांगली असून अत्यंत प्रामाणिकपणे या कामाला गती आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
आपण आजपर्यंत ११०० देवस्थानाचे मोजमाप (Tulja Bhavani Donation Box) केले आहे परंतु तुळजाभवानीचा हा सोन्या चांदीचा खजिना अलौकिक आहे. भाविक भक्तांची मोठी श्रद्धा देवीवर किती मोठ्या प्रमाणावर आहे याची साक्ष या अर्पण वस्तू वरून दिसून येते असेही ते याप्रसंगी म्हणाले.
पाच किलोचे एक बॅग प्रमाणे मोजमाप केलेल्या सोन्याच्या वस्तू एकत्रित करण्यात येणार आहे. आतापर्यंत २६ किलो सोन्याची मोजमाप प्रक्रिया पूर्ण झाली आहे, असेही त्यांनी याप्रसंगी सांगितले. ३४८ हिऱ्यांचे खडे २४ कॅरेट हिऱ्याचे मंगळसूत्र शनिवारी (दि. १०) दुपारी या मोजमापामध्ये निदर्शनास आले आहेत. बाजार भावमध्ये याची किंमत मोठी आहे.
हेही वाचा