तुळजापूर : देवीला अर्पण सोने, चांदी वितळवण्यात येणार; सोमवारपासून पार पडणार प्रक्रिया | पुढारी

तुळजापूर : देवीला अर्पण सोने, चांदी वितळवण्यात येणार; सोमवारपासून पार पडणार प्रक्रिया

तुळजापूर, पुढारी वृत्तसेवा : देवीला अर्पण केलेले सोने, चांदी वितळविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोमवारी (दि. ५) रोजी ही प्रक्रिया होणार आहे. सोने,चांदी वितळविण्याची प्रक्रिया ही व्हिडीओ रेकॉर्डींग व सीसीटीव्ही कॅमेराच्या निगराणीत पार पडणार आहे.

यासाठी जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष डॉ. ओम्बासे यांनी समिती स्थापन केली आहे. या समितीमध्ये नायब तहसिलदार निवडणूक तुळजापूर, सहा. धर्मादाय आयुक्त प्रतिनिधी, जिल्हाधिकारी कार्यालयाचे लेखाधिकारी, अमरराजे कदम अध्यक्ष भोपे पुजारी मंडळ, सज्जनराव साळुंके अध्यक्ष पाळीकर पुजारी मंडळ, अनंत कोंडो अध्यक्ष उपाध्ये पुजारी मंडळ, महंत चिलोजीबुवा, महंत तुकोजीबुवा, स्टेट बँक आँफ इंडियाचे सोनार धनंजय वेदपाठक व रवि महामुनी हे असणार आहेत.

तुळजाभवानी मंदिर संस्थानकडून अलीकडच्या काळात सोने-चांदी वितळवण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे सोने, चांदी याचे योग्य मूल्यांकन होणार असून याचा फायदा मंदिर संस्थानला होणार आहे.
-अमरराजे कदम, (अध्यक्ष तुळजाभवानी भोपे पुजारी मंडळ तुळजापूर)

Back to top button