परभणीत शिवशाही बसखाली चिरडून महिलेचा मृत्यू | पुढारी

परभणीत शिवशाही बसखाली चिरडून महिलेचा मृत्यू

परभणी, पुढारी वृत्तसेवा : रेल्वे स्थानकासमोरील कुंजबिहारी हॉटेलजवळील वळणावर एसटी महामंडळाच्या शिवशाही बसखाली येवून एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. गुरूवारी (दि.1) सकाळी 11 च्या सुमारास ही घटना घडली. मात्र या अपघातात मृत महिलेची ओळख पटू शकली नाही.

याबाबत मिळालेलया माहितीनुसार, एसटी महामंडळाची हिंगोली आगाराची हिंगोली-परभणी ही शिवशाही बस (क्र.एम.एच.09 ई.एम.2293) ही गुरूवारी सकाळी पावणे अकराच्या सुमारास वसमत रोडवरून डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा, रेल्वेस्टेशन समोरून बसस्थानकाकडे जात होती. कुंजबिहारी हॉटेल समोरील वळणावरून ही बस जात असताना एक महिला बसच्या मागील चाकाखाली आली. अवघ्या काही क्षणातच तिचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेनंतर मोठा जमाव या ठिकाणी जमा झाला होता. दरम्यान शहर पोलिस वाहतूक शाखेचे फौजदार, कर्मचारी, नवा मोंढा पोलीस ठाण्याचे पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. दरम्यान त्या महिलेची ओळख पटविण्याचा प्रयत्न केल्यानंतरही कोणताही पुरावा मिळाला नाही. दरम्‍यान या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत.

-हेही वाचा 

नगर: अखेर जावेद शेख या बोगस मुन्नाभाईवर गुन्हा दाखल

दूधगंगेतून एक थेंबही पाणी देणार नाही : राजगोंडा पाटील

पुणे: एड्स नियंत्रण सोसायटीला मिळणारी देणगी होणार करमुक्त

Back to top button