शासन आपल्या दारी! आम्ही घरी बसून सरकार चालवत नाही : मुख्यमंत्री शिंदे | पुढारी

शासन आपल्या दारी! आम्ही घरी बसून सरकार चालवत नाही : मुख्यमंत्री शिंदे

कन्नड : छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड शहरातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शासन आपल्या दारी कार्यक्रमात शासकीय योजनांचा पाढा वाचला. यावेळी उपस्थित असलेल्या सर्व नागरिक उन्हा-तान्हात बसलेले पाहून त्यांनी कौतुक केले. त्याचसोबत यावेळी त्यांनी आम्ही घरी बसून सरकार चालवत नाही असा टोला विरोधकांना मारला. (eknath shinde )

शिंदे यांचा कन्नड दौरा आहे. यावेळी शिंदे म्हणाले- प्रसारमाध्यमे हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. त्यावर विश्वास ठेवा. पण, माध्यमांनी जे सत्य आहे, ते दाखवलं पाहिजे. सत्य परिस्तिती आज महाराष्ट्रातील सर्वांना दाखवून द्या. माध्यमांनी गर्दीही दाखवावी. ही गर्दी पैसे देऊन जमा केलेली नाही. नाही तर विरोधक म्हणतात, लोक उठून गेले.

शिंदे पुढे म्हणाले-रत्नागिरीत शासन आपल्या दारी अभियान झालं. १३ मे रोजी पाटण येथे अभियानाची सुरुवात झाली. आजपर्यंत लोकांना शासनाच्या दारी जावं लागायचं. मग आम्ही फडणवीस यांनी ठरवलं की, आपण का लोकांच्या दारी जाऊ शकत नाही? त्यातून शासन आपल्या दारी ही संकल्पना सुरु झाली. आम्ही घरी बसून सरकार चालवत नाही. जनतेपर्यंत पोहोचायचं अस फडणवीस आणि मी ठरवलं.

जे शासन निर्णय आम्ही घेत गेलो, ते लोकांच्या हिताचे आहेत. २८ प्रलंबित सिंचनाच्या योजनांना मंजुरी दिलीय. ६ लाख हेक्टर जमिन ओलिताखाली येणार आहे. अवकाळी पाऊस, दुष्काळ, गारपीट त्यामुळ शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. विरोधकांना महाराष्ट्रातील परिस्थिती दाखवा. हे जनतेच्या मनातील सरकार आहे. मागेल त्याला शेततळे या सरकारने दिले. पंतप्रधान मोदी यांचे पाठबळदेखील आपल्याला आहे, असेही त्यांनी नमूद केले.

Back to top button