विकृतीचा कळस : ५० वर्षीय नाराधमाचा ४ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार | पुढारी

विकृतीचा कळस : ५० वर्षीय नाराधमाचा ४ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार

वाशिम, पुढारी वृत्‍तसेवा : शहरातील चार वर्षीय बालिका अंगणवाडीमध्ये जात असताना एका नराधमाने चिमुकलीवर अत्याचार केला. ही घटना बुधवार २४ मे रोजी सकाळी ११ वाजताच्या दरम्यान घडली. हरीश राठी (वय ५० रा . वाशिम) असे या नराधमाचे नाव आहे. घटनेनंतर आरोपी फरार झाला असून पोलीसाकडून त्याचा शोध सुरू आहे.

पोलीसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, बुधवाररी (दि. २५) सकाळी ११च्या दरम्यान एक सहा आणि चार वर्षीय या दोन बहिणी अंगणवाडीमध्ये जात होत्या. दरम्यान आरोपी हरीश राठी याने बळजबरीने चार वर्षीय मुलीला जवळच असलेल्या एका गोडावुन मध्ये उचलून नेवून तिच्यावर केला. पीडित मुलीने आरडाओरड केल्याने आरोपी हरिष हा घटनास्थळावरुन फरार झाला. घटनेची पीडित मुलीने आपल्या नातेवाईकांना सांगितल्यावर त्यांनी वाशिम शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पोलीसांनी याबाबत गुन्हा दाखल केला आहे. तसेच या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

-हेही वाचा 

वाल्हे : भोरवाडी फाटा येथे रेल्वे रुळावर ट्रक पलटी

समृद्धी महामार्गाचा दुसरा टप्पा झाला पूर्ण, शिर्डी ते भरवीरपर्यंतच्या मार्गाचे 26 मे रोजी होणार लोकार्पण

Row over new Parliament building | नवीन संसद भवनाचे उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते व्हावे, सुप्रीम कोर्टात याचिका

 

Back to top button