हिगोंली : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी शिवाजी भालेराव यांची बिनविरोध निवड | पुढारी

हिगोंली : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी शिवाजी भालेराव यांची बिनविरोध निवड

जवळाबाजार; पुढारी वृत्तसेवा :  कृषी उत्पन्न बाजार समितीतील नुतन सभापती पदावर सेनेचे शिवाजी अप्पा भालेराव व उपसभापती पदावर राष्ट्रवादीकडून बाबाराव राखोंडे याची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. मंगळवार ( दिनांक २३ मे ) रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीत नुतन सभापती व उपसभापती निवड आयोजित करण्यात आली होती.

शिवसेनाचे माजी सहकार मंत्री डॉ. जयप्रकाश मुंदडा याचे कट्टर समर्थक व माजी उपसभापती पदावर काम केलेले शिवाजी अप्पा कृष्णाजी भालेराव याची सभापती पदावर निवड बिनविरोध करण्यात आली. तर राष्ट्रवादी आमदार राजूभैया नवघरे यांच्याकडून बाबाराव नारायण राखोंडे याची उपसभापती पदावर निवड करण्यात आली आहे. यामुळे उपसभापती पदावर नवीन चेहऱ्याला संधी मिळाली आहे. या निवडीकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. जवळाबाजार येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतील निवडणुकीत शिवसेना व राष्ट्रवादी पॅनलचे एकूण नुतन १८ संचालकमध्ये १६ संचालक निवडून आले आहेत. यामध्ये ४ माजी संचालक व १२ नवीन चेहऱ्याला संचालक संधी मिळाली.

उद्धव भगवानराव सावंत, शिवाजीराव कृष्णाजी भालेराव, भगवानराव खंडबाराव काचगुंडे, विश्वप्रसाद उर्फ बबलू बाबुराव चव्हाण, शिवाजीराव कृष्णापा चोपडे, बाबाराव नारायण राखोंडे, संजय सखाराम चव्हाण, ज्ञानदेव मुंजाजीराव ठोबळे, भानुदास सोपान गीते, विनोद मारोतराव अंभोरे, अंगद सुंदरराव गायकवाड, राहुल अमनाजी सुर्यतळ, चंद्रकला रामजी बोंगाणे, शांताबाई गंगाधर भोंग, प्रतिभा रमेश मानवते, सुमित्रा नवनाथ पाटील आदी संचालक उपस्थितीत होते. एकंदरीत जवळाबाजार येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत नुतन संचालकामध्ये ८ शिवसेनेचे संचालक व ८ राष्ट्रवादीचे संचालक विजयी झाले आहेत. नुतन सभापती व उपसभापती निवडीकडे सर्वाचे लक्ष लागले होते. हिंगोली जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजारपेठ जवळाबाजार येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे. येथील कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत हट्टा व  शिरड शहापुर उपबाजार समिती चालते.

कृषी उत्पन्न बाजार समितीत सभापती पदावर अनुभव माजी संचालकांना संधी व उपसभापती नवीन चेहऱ्याला संधी माजी सहकार मंत्री डॉ. जयप्रकाश मुंदडा, माजी आमदार जयप्रकाश दांडेगावकर व आमदार राजूभैया नवघरे याचा नेतृत्व खाली  मिळाली आहे. नुतन सभापती व उपसभापती निवड करण्यात आल्यानंतर सत्कार करण्यात आला आहे. यावेळी माजी सहकार मंत्री डॉ. जयप्रकाश मुंदडा व आमदार राजूभैया नवघरे उपस्थितीत होते. माजी सहकार मंत्री डॉ. जयप्रकाश मुंदडा यानी सलग दुसरा वेळेस सभापती पद राखले आहे. यावेळी तहसीलदार डॉ. कानगुले, जिल्हा निबंधक मुकुंद देशमुख व सचिव रमेश चौखट यानी निवड प्रक्रिया पार पाडली.

हेही वाचा : 

Back to top button