बीड : दुचाकी अडवून १५ जणांच्या टोळीने महिला व पुरुषास सव्वा लाखाला लुटले

बीड : दुचाकी अडवून १५ जणांच्या टोळीने महिला व पुरुषास सव्वा लाखाला लुटले
Published on
Updated on

केज (बीड); पुढारी ऑनलाईन : मुलीच्या लग्नाची खरेदी करून एक महिला व पुरुष हे मोटार सायकली वरून जात असताना त्यांना केज येथे १५ तरुणांच्या टोळक्याने भरदिवसा अडवून बेदम मारहाण केली. त्यानंतर त्यांच्या जवळील सोन्याचे दागिने आणि मोबाईल काढून घेत महिलेचा विनयभंग केला. या प्रकरणी घाबरलेल्या पीडितांनी दुसऱ्या दिवशी पोलिसांत तक्रार करताच अवघ्या काही तासातच त्यातील एका आरोपींना अटक करून त्यांच्याकडून मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. तर अन्य आरोपींना ताब्यात घेण्यासाठी पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

या बाबतची माहिती अशी की, बुधवार (दि. १७) मे रोजी परभणी जिल्ह्यातील एक महिला व पुरुष हे त्या महिलेच्या मुलीच्या लग्नाची खरेदी आटोपून बार्शी येथून केज मार्गे सोनपेठकडे (जि. परभणी) जात होते. त्यावेळी दुपारी ५:३० वा. च्या दरम्यान ते केज येथील धारूर चौकातील एका पाणीपुरीच्या ठेल्यावर ते दोघे थांबले. तेथे असलेल्या एका तरुणाने ती महिला व पुरुष भिन्न धर्मीय असल्याने त्यांच्याकडे संशयाने पाहात होता. त्यानंतर सदर महिला व पुरुष रस्त्याने पुढे जाऊ लागताच काही तरुणांनी चार ते पाच मोटार सायकलीवरुन त्यांचा पाठलाग सुरू केला. पुढे एक कार देखील त्यांच्यात सामील झाली.

त्या सर्वांनी त्या महिला आणि पुरुषास अडवून मारहाण केली. त्यांच्या दोघाकडचे मोबाईल आणि गळ्यातील तीन तोळ्यांचे सोन्याचे लोकेट काढून घेतले. त्या दोघांनी आम्हला मारहाण करु नका अशी विनंती केली. पुढे त्यांना बळजबरीने कारमध्ये बसविण्या प्रयत्न केला गेला, परंतु ते दोघे कारमध्ये बसले नाहीत. नंतर एका तरुणाने त्या दोघांना मोटार सायकलवर बसवून आडवाटेने घेऊन जात असताना एका छोट्या पुलावर मोटार सायकलची गती कमी होताच पाठीमागे बसलेल्या त्या महिलेने मोटार सायकली वरून खाली उडी मारली आणि आरडा ओरड सुरु केला. त्यामुळे लोक जमा होताच त्या दोघांना सोडून त्या तरुणांचे टोळके फरार झाले. यानंतर घाबरलेल्या अवस्थेतील ती महिला व पुरुष जखमी अवस्थेत त्यांच्या मोटार सायकली वरून सोनपेठ (जि. परभणी) येथे पोहोचले. तेथे त्यांनी उपचार घेतले असून त्या पुरुषाच्या डोळ्याला त्या जमावाने केलेल्या मारहाणीत गंभीर मार लागला आहे.

दरम्यान शुक्रवार (दि. १९) सदर महिला आणि पुरुष यांनी केज येथे पोलीस ठाण्यात जाऊन घडलेल्या घटना पोलीस अधिकाऱ्यांना सांगितली आणि त्या संदर्भात सविस्तर तक्रार दिली. त्या तक्रारी वरून शनिवार (दि. २०) केज पोलीस ठाण्यात १५ अनोळखी तरुणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाण करून लूटमार करणाऱ्या पैकी सोहेल खतीब, एहतेशाम इनामदार या दोघांची ओळख पटली आहे. त्यातील एहतेशाम इनामदार याला पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील आणि पोलीस हेकॉन्स्टेबल श्रीकांत चौधरी यांनी अटक केली. त्याला न्यायालयाने सोमवार २९ मे पर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

या प्रकरणी सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत आणि पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील हे पुढील तपास करीत आहेत.

चोरलेले मोबाईल आणि व्हिडिओ फुटेजमुळे लागला गुन्हेगारांचा तपास

त्या पुरुष आणि महिलेला तरुणांचा जमाव मारहाण करीत असतानाचे व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागले आहेत. जमावाने त्यांचे घेतलेल्या मोबाईलमुळे गुन्हेगार पकडण्यात पोलिसांना मदत होणार आहे.

घटनास्थळी पोलीस अधिकाऱ्यांची भेट

घटनास्थळी सहाययक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी भेट देऊन तपासा संदर्भात मार्गदर्शन केले.

अधिक वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news