हिंगोली : हट्टा येथून अल्पवयीन मुलीसह दागिने व रोख रक्कम पळवली | पुढारी

हिंगोली : हट्टा येथून अल्पवयीन मुलीसह दागिने व रोख रक्कम पळवली

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : वसमत तालुक्यातील हट्टा येथे एका अल्पवयीन मुलीस फुस लाऊन दागिने व रोख रकमेसह पळवल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी गोविंद रामा होळकर या संशयित आरोपीवर हट्टा पोलिस ठाण्यात मंगळवारी (दि.१७) रात्री उशीरा गुन्हा दाखल झाला आहे.

हट्टा येथील एक सोळावर्षीय मुलगी रविवारी घरी एकटीच होती. तिची आई, वडील व भाऊ सकाळी शेतात गेले होते. मुलगी घरी एकटी असल्याचा गैरफायदा घेत गोविंद होळकर याने मुलीला फुस लावली अन् तिच्याकडे असलेले दागिने व रोख रकमेसह तिला पळवले. दुपारी मुलीचे कुटुंबिय घरी आले असता मुलगी घरी दिसली नाही. त्यामुळे तिच्या कुटुंबियांनी तिचा शोध सुरु केला. गावात तसेच नातेवाईकांकडे विचारणा केली असता मुलगी सापडली नसल्याने कुटुंबियांनी पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन बोराटे, जमादार कावरखे पुढील तपास करीत आहेत.

हेही वाचा : 

Back to top button