प्रा. राजन शिंदे यांच्या खुनाचा उलगडा, अल्पवयीन ताब्यात | पुढारी

प्रा. राजन शिंदे यांच्या खुनाचा उलगडा, अल्पवयीन ताब्यात

औरंगाबाद; पुढारी वृत्तसेवा

प्रा. राजन शिंदे यांच्या खुनाचा तब्बल आठ दिवसानंतर उलगडा झाला. पोलिस आयुक्तांनी तयार केलेल्या विशेष तपास पथकाने एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. त्याच्या कबुलीवरून शनिवारपासून पाणी उपसा सुरु असलेल्या विहिरीतून खुनातील हत्यार जप्त करण्यात आले.

प्रा. राजन शिंदे यांच्या खुनाची घटना 11 ऑक्टोबर रोजी घडली होती. खुनाचे गूढ दिवसेंदिवस वाढत चालले होते. पोलिसांसाठी प्रत्येक दिवस नवीन आशा जागृत करणारा उगवतो मात्र मावळताना पोलिसांच्या हातात काहीही मिळत नव्हते. घटना उघडकीस आल्यापासून पोलिसांनी निकटवर्तीय व कुटुंबियांना टार्गेट केलेले आहे.

आठव्या दिवसापर्यंत कुटुंबियांची चौकशी करण्यात आली. अखेर या गुन्ह्याचा छडा लावण्यात आला. शनिवारपासून पाणी उपसा सुरु असलेल्या विहिरीत खून करण्यासाठी वापरलेले शस्र जप्त केले. उपायुक्त दीपक गिऱ्हे, पोलिस निरीक्षक अविनाश आघाव आणि पथक ही कारवाई करीत आहे.

हेही वाचलत का?

Back to top button