माहूर येथे सोयाबीनच्या गंजीला लागलेल्या आगीत दोन लाखाचे नुकसान | पुढारी

माहूर येथे सोयाबीनच्या गंजीला लागलेल्या आगीत दोन लाखाचे नुकसान

श्रीक्षेत्र माहूर; पुढारी वृतसेवा: माहूर तालुक्यातील हिंगणी येथील शेतात कापून ठेवलेल्या सोयाबीनच्या गंजीला अज्ञाताने आग लावल्याने सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेची फिर्याद अविनाश गोविंदराव हुलकाने यांनी गुरूवार (दि.१४) रोजी माहूर तहसीलदार व पोलीस स्टेशनला दिली आहे.

शेतकरी अविनाश हुलकाने यांने बुधवारी रोजी दिवसभर मजूर लावून सोयाबीन कापून शेतात गंजी लावली होती. दुसऱ्या दिवशी मळणीयंत्र सुद्धा बोलावले होते. परंतु, रात्री गावात किर्तनाचा कार्यक्रम असल्याने त्यांनी सोयाबीनच्या गंजी झाकून ठेवत ते गावात गेले.

रात्री १२ वाजण्याच्या सुमारास किर्तन थांबल्याने सभामंडपातून बाहेर आले असता त्यांना शेतातून धूर येताना दिसला. आग लागल्याचती बाब लक्षात येताच अविनाशसह काही शेतकऱ्यांनी शेताकडा धाव घेवून सोयाबीनच्या गंजीला लागलेली आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. तोपर्यत खूपच वेळ झाला होता. या दरम्यान २५ ते ३० क्विंटल सोयाबिन जळून खाक झाले होते.

सदर घटनेची फिर्याद अविनाश हुलकाने यांनी माहूरच्या तहसीलदार राकेश गिड्डे आणि पो. नि. नामदेव रिठे यांच्याकडे केली. याशिवाय त्यांनी या घटनेची लवकरात- लवकर चौकशी करून शासकीय मदतीची मागणी केली.

Shah Rukh Khan समोरच समीर वानखेडेंनी आर्यन खानच्या कानाखाली दोनवेळा जाळ काढला?

आतापर्यंत इलियास बावाणी, इम्रान नवाब व बुड्डा भोई या शेतकऱ्यांच्या सोयाबीन गंजीला आग लावून प्रचंड नुकसान करण्यात आले होते. हा प्रकार नित्याचाच झाल्याने जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधिक्षकांची भेट घेऊन याबाबत चौकशी पथक नेमण्याची विनंती करणार असल्याची माहिती गावक-यांनी दिली.

हेही वाचलंत का?

पाहा व्हिडिओ : कोल्हापूरच्या शाही दसऱ्याचा इतिहास

Back to top button