गेवराई ; गजानन चौकटे : सध्या उन्हाळा सुरू असून, दिवसेंदिवस तापमानात वाढत होतं आहे. वाढत्या तापमानामुळे उन्हात फिरणाऱ्या व्यक्तीला उष्माघात (Heat Stroke) होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे तीव्र उन्हात फिरू नये. नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन तहसीलदार सचिन खाडे यांनी केले आहे.
घराबाहेर पडताना डोके झाकण्यासाठी छत्री अथवा कापड अथवा टोपीचा वापर करावा. दुपारी १२ ते ४ या वेळेत उन्हात (Heat Stroke) काम करणारे मजूर, शेतमजूर, वीटभट्टी कामगार व बांधकाम करणारे मजूर आदींनी उन्हात काम करणे टाळावे. तीव्र सूर्यप्रकाशापासून वाचण्यासाठी घरातील पडदे आणि झुडपांचा वापर करावा. हलके, पातळ व सच्छिद्र, पांढरे सुती कपडे वापरावेत. प्रवासात पिण्याचे पाणी सोबत ठेवावे. उन्हात काम करीत असल्यास टोपी, छत्री किंवा ओल्या कपड्याने डोके, मान, चेहरा झाकावा.
लघवीचा रंग जास्त पिवळसर झाला किवा लघवीचे प्रमाण कमी झाल्यास पाणी व शीतपेय प्यावे. अशक्तपणा, डोकेदुखी सतत येणारा घाम आदीचा उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखावीत व चक्कर येत असल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, गुरांना छावणीत ठेवावे, तसेच त्यांना पुरेसे पाणी पिण्यास द्यावे. याप्रमाणे काळजी घ्यावी.
उष्माघात होऊ नये यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून याबाबत मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. त्यांचे पालन करण्याचेही आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. यामधे उष्माघाताची परिस्थिती उद्भवल्यास सर्वप्रथम व्यक्तीला सावलीत किवा थंड ठिकाणी न्यावे. शरीर ओले करून, पंखा सुरु ठेवावा. शॉवर दिल्यास अधिक चांगले होईल. पुरेसे पाणी प्यावे, तहान लागली नसली तरीही दर अर्ध्या तासाच्या फरकाने पाणी प्यावे, दिवसभर ही सवय पाळावी.
शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओआरएस, घरी बनवलेली लस्सी, कैरीचे पन्हे, लिंबू-पाणी, ताक इत्यादीचा वापर नियमित करा.वाढत्या उष्णतेमुळे सर्वांचेच बाहेर पडणे आणि काम करणे कठीण झाले आहे. घरातून बाहेर पडताच कडक उन्हामुळे घाम फुटतो. या रणरणत्या उन्हामुळे आपण आजारी देखील पडू शकता. मात्र, काही गोष्टी लक्षात ठेवून, स्वतःची काळजी घेऊन, तुम्ही उन्हाच्या तडाख्यापासून दूर राहू शकता. उन्हाळ्यात स्वतःचे संरक्षण कसे करावे, यासाठी काही खास टिप्स…
घराबाहेर पडताना तोंड आणि डोके कडक सूर्यप्रकाशापासून संरक्षित केले पाहिजे. कारण, जेव्हा हा तप्त सूर्य प्रकाश तुमच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर पडतो, तेव्हा तुम्हाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. यामुळे तुमचा चेहरा काळा होऊ शकतो आणि टॅनिंग होऊ शकते. दुसरीकडे सूर्यप्रकाश डोक्यावर पडल्याने डिहायड्रेशनची समस्याही होऊ शकते.
याशिवाय उन्हाळ्यात शरीरात पाण्याची कमतरता भासू देऊ नका. पाण्याची कमतरता भासू नये, म्हणून वेळोवेळी पाणी पीत रहा. उन्हाळ्यात लोक भरपूर पाणी पितात. परंतु तरीही त्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
उन्हाळ्यात नेहमी सुती आणि आरामदायी कपडे घालावेत. कारण, इतर कापडांमुळे तुम्हाला खूप लवकर उष्णता जाणवायला लागेल आणि तुम्ही दिवसभर अस्वस्थ राहाल.
रखरखत्या उन्हात जेव्हा घराबाहेर पडाल, तेव्हा सनस्क्रीन लोशन लावा. यामुळे तुमची त्वचा कडक सूर्यप्रकाशापासून सुरक्षित राहील. तसेच, तुमची त्वचा काळी पडणार नाही आणि टॅनिंगही होणार नाही.
सूर्य सध्या आग ओकत आहे. नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. भरपूर पाणी प्यावे. फळांचे सेवन व नियमित योगासने करावीत.
– डॉ. बी. आर. मोटे, आधार हॉस्पिटल, गेवराई
हेही वाचा