

जालना: पुढारी वृत्तसेवा: बस आणि कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात कारचालक ठार झाला. तर कारमधील ४ ते ५ जण जखमी झाले. त्यांना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. हा अपघात आज (दि. १८) सकाळी साडे अकराच्या सुमारास जालना ते देऊळगावराजा रस्त्यावरील जामवाडीजवळ झाला. यात कारचालक विजय कौतीकराव जाधव (वय ३५) हे जागीच ठार झाले.
याबाबत अधिक माहिती अशी की, अंबड आगाराची अकोलाकडे जाणाऱ्या बसचा (एमएच-०६, एस-८६६८) आणि जाफराबादकडून जालन्याकडे येणाऱ्या कारची (एमएच-२१, एएक्स-१७९०) जामवाडीजवळ समोरासमोर धडक झाली. अपघातानंतर बस दुभाजकावर जाऊन आदळली. यावेळी संतप्त नागरिकांनी बसवर दगडफेक करत बसच्या काचा फोडल्या.
जालना पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
हेही वाचा