जालना: मिरवणुकीत नाचण्याच्या कारणावरून तरुणाचा खून | पुढारी

जालना: मिरवणुकीत नाचण्याच्या कारणावरून तरुणाचा खून

जालना: पुढारी वृत्तसेवा : रामनवमीच्या मिरवणुकीत नाचण्याच्या किरकोळ वादातून तरुणाचा खून झाल्याची घटना गुरूवारी जालन्यात घडली. विष्णू उर्फ विक्की राम सुपारकर (रा. जुना जालना) असे मृताचे नाव आहे. त्याचा काही तरूणांसोबत नाचण्याच्या कारणामुळे वाद झाला. वादाचे रूपांतर भांडणात झाले. दुसऱ्या तरुणाने चाकूने त्याच्या छातीवर वार केले. त्यामुळे रक्तस्त्राव जास्त झाल्याने तरूणाला उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषीत केले.

दरम्यान, मृतांच्या नातेवाईकांना घटनेची माहिती मिळताच रुग्णालय गाठले. नातेवाईक आणि मित्र परिवार एकत्र आले. त्यांनी आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या दिला. यावेळी रुग्णालयात माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर दाखल होत नातेवाईकांचे सांत्वन केले.

उपविभागीय पोलीस अधिकारी निरज राजगुरू यांनी दोन संशयित आरोपी पकडल्याची माहिती नातेवाईकांना दिली. रात्री उशिरापर्यंत जमाव पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मारून होता.

हेही वाचा 

Back to top button