जालना: माजीमंत्री राजेश टोपे यांच्या गावात मतदानावेळी राष्ट्रवादी- भाजपमध्ये राडा | पुढारी

जालना: माजीमंत्री राजेश टोपे यांच्या गावात मतदानावेळी राष्ट्रवादी- भाजपमध्ये राडा

वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा : माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या पाथरवाला बुद्रुक (ता. अंबड) या गावातील विविध कार्यकारी सोसायटीची निवडणूक आज (दि.१) होत आहे. दरम्यान, मतदानाचा अधिकार देण्यावरून राष्ट्रवादी -भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेची माहिती कळताच पोलीस उपविभागीय अधिकारी सुनील पाटील यांनी मतदान केंद्रावर येऊन शांतता राखण्याचे आवाहन केले. तसेच जालना मुख्यालयातून दंगल नियंत्रण पथकाची कुमक मागविली.

या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या समर्थ शेतकरी ग्रामविकास पॅनल, तर भाजप- शिवसेनेच्या समृद्धी ग्रामविकास पॅनलमध्ये चुरशीची लढत आहे. यावेळी सोसायटीचे मतदान सुरु असताना वयस्कर मतदाराचे मतदान करण्यावरून आक्षेप घेतल्याने राष्ट्रवादी -भाजप सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. भाजपच्या कार्यकर्त्यांना जिवे ठार मारण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप भाजप कार्यकर्ते यांनी एका व्हिडीओ द्वारे केला आहे.

समर्थ बँकेचा कर्मचारी एका वयस्कर मतदाराला मतदान करण्यासाठी घेऊन येत होता. यावर आम्ही आक्षेप घेतला असता अॅड. संभाजी टोपे, अमोल टोपे, बंडू कनूजेसह इतर लोक अंगावर धावून येत आम्हाला मारहाण केली.
शिवाजी मोरे, शिवसेना तालुकाप्रमुख अंबड

हेही वाचा 

Back to top button