जालना: अवैध वाळू उपसा करणाऱ्या १८ जणांवर मोठी कारवाई | पुढारी

जालना: अवैध वाळू उपसा करणाऱ्या १८ जणांवर मोठी कारवाई

वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा: अंबड तहसीलदार व महसूल पथकाने मोठी कारवाई करत अंबड तालुक्यातील साष्टपिंपळगाव गोदावरी नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करणाऱ्या 18 जणांच्या स्थावर व जंगम मालमत्तेवर 4 कोटी 90 लाख 72 हजार रुपयांचा सामूहिक बोजा टाकण्यात आला. ही कारवाई अंबड तहसीलदार चंद्रकांत शेळके व महसूल पथकातील कर्मचारी यांनी केली आहे.

मागील 20 दिवसांत साष्टपिंपळगाव गोदावरी नदीपात्रातून केणीच्या सहाय्याने 20 फूट खोल पाण्यातून  अवैधरित्या 2 हजार ब्रास वाळू उपसा केला. या प्रकाराचा महसूल पथकाने पंचनामा करून सदर अवैध वाळू उपसा करणाऱ्या दत्ता मधुकर खराद (रा. साष्टपिंपळगाव), प्रदीप धोत्रे (रा. शहागड), लखन परदेशी (रा. शहागड), विलास खेडकर (रा. अंकुशनगर), शुभम चावरे (रा. पाचोड), विजय मरकड (रा. गोंदी), नारायण खराद (रा.डोमलगाव), माऊली खराद (रा. गोंदी), गणेश उद्धव खराद, नाथाजी भास्कर खराद, संजय नानासाहेब कटारे (शेत मालक कटारे पॉईंट), विकास खराद (रा.गोंदी), दुर्गादास वाटोरे (रा.गोंदी), मनोज खराद (रा. गोंदी), अमर  खराद (रा.डोमलगाव), नामदेव गुलजकर (रा.डोमलगाव), अमोल पंडित (रा. अंकुशनगर), कृष्णा एकनाथ गुलजकर (रा.डोमलगाव) या 18 जणांवर सामूहिक बोजा टाकण्यात आला.

असा टाकला बोजा

दत्ता मधुकर खरात व त्यांचे सहकारी ट्रॅक्टर केणी मालक लोकेशन बघणारे व संजय नानासाहेब कटारे (शेत मालक कटारे पॉइंट) सर्व संबंधित आदेशात नमूद १८लोकांच्या नावे ४ कोटी नव्वद लाख ७२ हजार दोनशे रुपयांचा सामूहिक रित्या जंगम व स्थावर मालमत्तेवर बोजा टाकण्यात आला. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 मधील नियम 48 कलम 7 व 8 अन्वये अवैध गौण खनिज उत्खनन व त्यावरील प्रतिबंधात्मक कार्यवाहीत दंडनीय वसूली विहित केली आहे.

हेही वाचा 

Back to top button