जालना : वडीगोद्री परिसरात अवकाळी पाऊस; गहू हरभरा व फळबागाला फटका | पुढारी

जालना : वडीगोद्री परिसरात अवकाळी पाऊस; गहू हरभरा व फळबागाला फटका

वडीगोद्री; पुढारी वृत्तसेवा : वडीगोद्री शहागड गोंदी अंकुशनगर परिसरात गारा आणि वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. त्याच बरोबर वादळी वाऱ्यामुळे परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला आहे. अवकाळी पावसाचा गहू हरभरा,कांदा व फळबाग पिकाला मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे.

गारा पडल्यामुळे त्या ठिकाणी मोठे नुकसान झाले असून गारांच्या पावसामुळे टरबूज व फळगाचे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुने शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला असून दिवाळीत झालेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई अद्याप मिळाली नसताना परत उन्हाळ्याच्या सुरुवातीला अवकाळी पाऊसामुळे पिकांचे नुकसान याची नुकसान भरपाई कधी मिळेल असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

 

हेही वाचा;

Back to top button