

बुलढाणा ; पुढारी वृत्तसेवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत शिवसेनेचे सर्व आमदार व भाजपचेही काही आमदार श्रीक्षेत्र अयोध्या येथे श्रीराम जन्मस्थळी दर्शनाला गेले होते. शिवसेनेचे मेहकरचे आमदार संजय रायमूलकर हेही या दौ-यात सहभागी झाले होते. दरम्यान रविवारी आमदार रायमूलकर यांचे पुत्र निरज व स्नुषा शाल्मली या दाम्पत्याला कन्यारत्न प्राप्त झाले.
आपण आजोबा झाल्याची ही आनंदवार्ता आमदार रायमूलकर यांनी सर्वप्रथम मुख्यमंत्री शिंदे यांना सांगितली. यावर शिंदे यांनी त्यांचे अभिनंदन केले व नवजात नातीचे नांव 'अयोध्या' ठेवा असे रायमूलकर यांना सुचवले. अयोध्येच्या दौ-यावर असतांना नात जन्मल्याने अयोध्या हे तीचे नामकरण समर्पक असल्याचे रायमूलकर यांनी आपल्या कुटूंबियांना कळवले आहे. लवकरच विधीवत हे नामकरण केले जाणार आहे.
हेही वाचा :